SBI चा गलथान कारभार ! ऑनलाईन ट्रांजेक्शन न करता तब्बल 54 हजार रुपये खात्यातून कपात; पैसे थेट बिहार सरकारच्या खात्यावर

परळी वैजनाथ/ बीड : पोलीसनामा ऑनलाइन –   टोकवाडी या गावातील रहिवासी लक्ष्मण मुंडे यांच्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या हलगर्जीपणामुळे अधिक त्रास सहन करावा लागत आहे. मुंडे यांच्या बँक खात्यातून कोणताही ओटीपी आला नाही तरीही ऑनलाईन ट्रांजेक्शन न करता तब्बल 54 हजार रुपये कमी झाले आहेत. 22 डिसेंबरला यासंदर्भात बँकेत येऊन चौकशी केली असता बिहार राज्य सरकारने काही विभागाच्या खात्यात हे पैसे जमा झाल्याची शाखाधिकारी यांनी सांगितले. त्यामुळे तक्रार देण्यात आले शाखाधिकारी अनंत नाग यांनी एक ते दोन दिवसात तुमचे पैसे परत मिळतील असे सांगितले २६ दिवस झाले तरी पैसे खात्यात जमा झाले नाहीत.

हे पैसे बिहार राज्य सरकारच्या एका विभागाच्या खात्यात 21 डिसेंबरला हस्तांरीत झाले आहे. याबाबतची तक्रार बँकेच्या शाखेत देऊनही शाखाधिकारी यांच्या हलगर्जीपणामुळे आणखीनही पैसे खात्यात जमा झाले नाहीत. याचा त्रास खातेदारास सहन करावा लागत आहे. टोकवाडी येथील रहिवासी लक्ष्मण मुंडे यांचे अनेक वर्षापासून स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेत खाते आहे, मागच्या अनेक वर्षापासून या खात्यातून व्यवहार केला जातो. परंतु 21 डिसेंबरला रात्री अचानक मुंडे यांच्या खात्यातून तीन वेळा पैसे कमी झाले. सुरुवातीला ३९६०५, २३००, २३०० आणि ६३५० याप्रमाणे पैसे कमी होत गेल्यानंतर ११४० रुपये ट्रांजेक्शन चार्ज ही कपात करण्यात आली.

बँक शाखाअधिकारी यांच्या हलगर्जीपणामुळे हे पैसे आणखीनही परत मिळाले नाहीत त्या संदर्भात लक्ष्मण मुंडे यांनी सांगितले की आम्ही आमच्या खात्यात पैसे जमा ठेवले म्हणून आमच्या गुन्हा झाला का आम्ही खात्यात पैसे ठेवावेत का नाही आमच्या कडून कर्ज असल्यास एक दिवस झाला की व्याज लावते. मला जेवढे पैसे खात्यात जमा होण्यासाठी लागतील तेवढ्या दिवसाची वेळ मिळणे आवश्यक आहे तसेच मी कोणताही ऑनलाइन व्यवहार केला नाही, मला ओटीपी आला नाही मग तरीही पैसे खात्यातुन कमी झाले कसे? मी यासंदर्भात वरिष्ठांकडे तक्रार केली आहे. ते पण यासंदर्भात काही करत नाहीत सामान्य माणसांनी नेमका न्याय कोणाकडे मागायचा असा प्रश्न निर्माण झाला आहे. माझे पैसे लवकरात लवकर खात्यात जमा करावेत नाहीतर बँके समोर उपोषण करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले आहे.