फायद्याची गोष्ट ! SBI च्या या स्कीमचा तुम्ही देखील घेऊ शकता ‘लाभ’, एका आठवडयात FD पेक्षा ‘दुप्पट’ तर 6 महिन्यात दिला 50 % नफा

पोलिसनामा ऑनलाईन – अनेक जण काबाड कष्ट करून पैसे जमवत असतात. तसेच काही जण एफडी, आरडी यांसह बचत योजनांमध्ये पैसे गुंतवत असतात. कोरोना काळात तर बचत किती महत्त्वाची आहे याचा प्रत्येकालाच अनुभव आला आहे. बचत योजनांमध्ये पैसे गुंतवताना बँकांच्या एफडीमध्ये पैसे ठेवणे आजही सर्वांना अधिक सुरक्षित वाटते. मात्र, सध्या सरकारी आणि खासगी क्षेत्रातील बँकाही केवळ ६ टक्केच व्याजदर देत आहेत. यामुळे आता अधिक नफा मिळविण्यासाठी गुंतवणूकदार म्युचूअल फंडमध्ये पैशांची गुंतवणूक करत आहेत.

असोसिएशन ऑफ म्यूचुअल फंड्स इन इंडियाने काही दिवसांपूर्वी जारी केलेल्या आकडेवारीनुसार, २०२० मध्ये म्युचूअल फंडात उघडण्यात आलेल्या खात्यांची संख्या ९.४३ कोटींच्याही पुढे गेली आहे. तर २०१९ मध्ये हि संख्या ६८ लाख इतकी होती. तज्ज्ञांच्या मते, प्रत्येक गुंतवणूकदार चांगले रिटर्न मिळण्याची अपेक्षा करत असतो त्यामुळे या काळात बँकिंग सेक्टरच्या SBI Banking & Financial Services Fund मध्ये पैसे लाऊन चांगला नफा मिळवला जाऊ शकतो. कारण येथे एका आठवड्यात १२ टक्के आणि ६ महिन्यात ५२ टक्क्यांपर्यंत रिटर्न मिळत आहेत. म्हणजे गेल्या आठवड्यात एखाद्या गुंतवणूकदाराने १० हजार रुपये यात गुंतवले असते, तर त्याला या आठवड्यात ११,१६२ रुपये मिळाले असते. तसेच ६ महिन्यांपूर्वी एखाद्याने पैसे गुंतवले असते, तर त्याला आता १५,२८७ रुपये मिळाले असते.

अर्थसंकल्पानंतर अनेक क्षेत्रात चान्गले परिणाम पाहायला मिळत आहे. स्थानिक शेअर बाजारातील महत्वाचे बेंचमार्क इंडेक्स सेंसेक्स आणि निफ्टीमध्ये विक्रमी तेजी दिसून येत आहे. यात बँकिंग शेअरमध्येही मोठ्या प्रमाणावर वाढ होताना दिसत आहे.बँकिंग शेअर्समध्ये अशाच प्रकारची तेजी सुरू राहणार असल्याचे जग भरातील रेटिंग एजन्सिजचे म्हणणे आहे. त्यामुळे आपल्याकडे यामध्ये गिणतवणूक करून चांगला नफा मिळविण्याची संधी आहे.

बँकिंग सिस्टममध्ये अर्थसंकल्पात झालेल्या काही घोषणांमुळे वेगाने सुधारणा होईल. यामुळेच बीएसईच्या बँकिंग इंडेक्सने एका दिवसात ९ टक्क्यांची उसळी घेतली. असे तज्ज्ञांचे मत आहे. म्‍यूच्युअल फंड्सचा विचार करता, बँकिंग सेक्‍टर फंड्सने एका दिवसात ७.६३ टक्के रिटर्न्स दिले आहेत. तर, वर्षभरातील खराब स्थितीनंतर, गेल्या तीन महिन्यांत या स्‍कीम्सनी ४० टक्के रिटर्न्स दिले आहेत. येणाऱ्या काळात बँकिंग म्युचूअल फंड्सशी संबंधित योजनांमध्ये लवकर पैसे दुप्पट होण्याची संधी असल्याचे म्‍यूचुअल फंडात गुंतवणूक करणाऱ्यांचे मत आहे. त्यामुळे अशा प्रकारच्या गुंतवणुकीतून आपणही लाभ मिळवू शकता.