State Bank of India । 10 आणि 11 तारखेला कोट्यावधी ग्राहकांना मिळणार नाहीत ‘या’ महत्त्वाच्या सेवा; बँकेनं सांगितलं महत्वाचं कारण

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – State Bank of India । भारताची सर्वात मोठी असणारी बँक स्टेट बँक ऑफ इंडिया (State Bank of India) ने ग्राहकांसाठी एक महत्वाची सूचना दिली आहे. बँकेच्या काही महत्त्वाच्या सेवा 10 जुलै आणि 11 जुलै या दोन दिवशी प्रभावित होणार आहेत. अशा काळात ग्राहकाला काही महत्त्वाचे व्यवहार करायचे असतील तर लवकरात लवकर हे व्यवहार पूर्ण करा. अशी याबाबत माहिती SBI ने ट्वीटच्या माध्यमातून दिली आहे.

State Bank of India । sbi customer alert due to maintenance few services to be hampered on july 10 and 11 night check here

‘मेंटेनन्स (Maintenance Activity) करता बँकेच्या काही सेवा 10 जुलै आणि 11 जुलै
तारखेला प्रभावित होणार आहेत. 10 जुलै रात्री 10.45 वाजल्यापासून 11 जुलै रात्री 12.15
वाजेपर्यंत उपलब्ध असणार नाहीत. या दरम्यान इंटरनेट बँकिंग (Internet Banking), योनो
(YONO), यूपीआय (UPI) आणि योनो लाइट (YONO Lite) या सेवा काम करणार नसल्याचं
बँकेनं सांगितलं आहे. या दरम्यान, इंटरनेट बँकिंग बाबत पासवर्ड वेळोवेळी बदलणे आवश्यक आहे.
ऑनलाइन पासवर्ड बदलणे आवश्यक आहे. म्हणून तुम्ही सायबर फसवणुकीपासून (Cyber
fraud) बचाव करू शकता. याबाबत SBI ने असं ट्विटद्वारे माहिती दिली आहे.

बँकेच्या कोट्यावधी ग्राहकांवर चिनी Hackers ची नजर –

चिनी हॅकर्स (Chinese Hackers) SBI च्या ग्राहकांना लक्ष्य करत आहेत. म्हणून ग्राहकांनी
फसवणुकीपासून सावधगिरी बाळगणे महत्वाचे असल्याचं बँकेनं सांगितलं आहे. एसबीआयच्या
(SBI) ग्राहकांची फसवणूक करण्यासाठी हे हॅकर्स अनेक प्रकारच्या घोटाळ्याचा (Scams) वापर करताना दिसत आहे. हे हॅकर्स ग्राहकांना लक्ष्य करण्यासाठी त्यांना व्हॉट्सअ‍ॅपवर मेसेज (Whatsapp) अथवा SMS पाठवत असतात.

स्टेट बँक ऑफ इंडियाने (SBI) असं सांगितलं आहे की, Whatsapp मेसेज अथवा SMS पाठवून
SBI ग्राहकांना केवायसी अपडेट (KYC Update) करण्याबाबत सांगितले जात आहे. यासाठी या
SMS मध्ये एक वेबसाईट Link देखील हॅकर्सकडून दिली जात आहे. दरम्यान, ही वेबसाईट SBI
च्या वेबसाईटशी मिळतीजुळती आहे. म्हणून ग्राहक फसले जात आहेत. अशी सविस्तर माहिती SBI
ने ट्विटच्या माध्यमातून दिली आहे.

हे देखील वाचा

Thackeray government | ठाकरे सरकारचा मोठा निर्णय ! सरकारी कर्मचारी व अधिकार्‍यांच्या सर्वसाधारण बदल्या 31 जुलैपर्यंत; पण 15 टक्केच

Ahmednagar Crime News । शिर्डीच्या साईबाबा संस्थानच्या कर्मचाऱ्याची झाडाला गळफास घेऊन आत्महत्या

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel :  State Bank of India । sbi customer alert due to maintenance few services to be hampered on july 10 and 11 night check here

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update