Video : SBI चे ग्राहक असाल तर तात्काळ समजून घ्या ‘ही’ गोष्ट, अन्यथा द्यावा लागेल भरमसाठ टॅक्स, जाणून घ्या

नवी दिल्ली : जर तुम्ही भारतीय स्टेट बँकेचे (एसबीआय) ग्राहक आहात आणि एका वर्षात आपल्या खात्यातून 20 लाख रूपयांची रोकड काढली असेल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. अशा स्थितीत एसबीआयने टॅक्सपासून वाचणासाठी खास पद्धत सांगितली आहे. देशातील या सर्वात मोठ्या बँकेने, अशा स्थितीत कशाप्रकारे टीडीएसपासून वाचता येईल हे सांगितले आहे. यासाठी तुम्हाला केवळ तीन स्टेप्स फॉलो कराव्या लागतील.

जर मागच्या तीन वर्षात कोणताही इन्कम टॅक्स रिटर्न फाइल केला नसेल आणि वार्षिक 20 लाख किंवा त्यापेक्षा जास्त रोकड काढली आहे तर सेक्शन 194 एन च्या अंतर्गत टीडीएस कापला जातो. एसबीआयने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून ही माहिती दिली आहे. जाणून घेवूयात याबाबत…

तुम्हाला काय करावे लागेल?

1. यासाठी सर्वप्रथम तुम्हाला बँकेत आपल्या पॅनकार्डची डिटेल्स जमा करावी लागेल. जर पहिल्यापासूनच पॅन कार्ड डिटेल्स दिली आहे, तर पुन्हा जमा करण्याची गरज नाही.

2. पॅन कार्ड नसल्यास टॅक्स वाढतो.

3. बॅकेला आपल्या इन्कम टॅक्सची डिटेल्स द्यावी लागेल.

जर तुम्ही मागच्या 3 वर्षात एकदा सुद्धा इन्कम टॅक्स रिटर्न दाखल केलेला नसेल तर 1 जुलै 2020 पासून आता तुम्हाला यावर व्याज द्यावे लागेल.

1. वार्षिक 20 लाख रुपये कॅश विड्रॉल करत असाल तर पॅन जमा करणे किंवा न करण्याच्या स्थितीत कोणतेही व्याज द्यावे लागणार नाही.

2. जर 20 लाख 1 रुपयापासून 1 कोटी रूपयांपर्यंत कॅश विड्रॉल करत असाल आणि पॅन कार्ड डिटेल्स जमा केल्या असतील तर तुम्हाला 2 टक्के टॅक्स कापला जाऊ शकतो. तर, पॅन डिटेल्स जमा नसल्यास 20 टक्के टीडीएस द्यावा लागेल.

3. जर एखाद्या व्यक्तीने 1 कोटी रूपयांपेक्षा जास्त कॅश विड्रॉल केली आहे आणि पॅन कार्ड डिटेल्स जमा आहेत तर 5 टक्के टीडीएस द्यावा लागेल. जर पॅन कार्ड डिटेल्स जमा केल्या नसतील तर 20 टक्के टीडीएस द्यावा लागेल.

SBI ने हेदखील सांगितले की, ज्या ग्राहकांनी मागच्या 3 वर्षात कोणत्याही वर्षी इन्कम टॅक्स रिटर्न भरलेला नसेल तर त्यांच्या 1 करोडपेक्षा जास्त विड्रॉलवर 2 टक्के टॅक्स कापला जातो.