SBI नं कोट्यवधी ग्राहकांना केलं अलर्ट, लक्ष्यात घेतलं नाही तर होऊ शकतं मोठे नुकसान, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशात बँकिंग फ्रॉडची प्रकरणे सतत वाढत आहेत. फ्रॉडस्टर्स नवनवीन पद्धतीने लोकांची फसवणूक करत आहेत. अशाप्रकारच्या फ्रॉडपासून वाचण्यासाठी देशातील सर्वात मोठी बँक म्हणजे भारतीय स्टेट बँक (एसबीआय) सतत लोकांना जागृत करत असते. याच पार्श्वभूमीवर एसबीआयने गुरूवारी सुद्धा ठगांच्या नवीन पद्धतीबाबत माहिती दिली आहे. सोबतच एसबीआयने हे सुद्धा सांगितले की, अशी फसवणुक झाल्यानंतर काय करायचे आणि आपली मेहनतीची कमाई या भामट्यांपासून कशी वाचवावी.

एसबीआयने आपल्या कोट्यवधी ग्राहकांना अलर्ट करत सांगितले आहे की, आमच्या ग्राहकांना फेक ई-मेल्स पाठवले जात आहेत. या ई-मेलशी एसबीआयचा काहीही संबंध नाही. असे ई-मेल उघडू नका. एसबीआय आपल्या ग्राहकांना अशाप्रकारचे कोणतेही ईमेल पाठवत नाही.

बँकिंग सर्व्हिससाठी अधिकृत पोर्टलचा करा वापर
एसबीआयने म्हटले की, जर तुम्हाला एसबीआयच्या नावाने असा कुणी मेसेज पाठवत असेल तर ताबडतोब रिपोर्ट करा. एसबीआयने ट्विटमध्ये एक लिंक सुद्धा दिली आहे. ही लिंक नॅशनल सायबर क्राइम रिपोर्टिंग पोर्टलची आहे. फ्रॉडस्टर्सचा असा कोणताही ई-मेल प्राप्त झाल्यास या पोर्टलवर रिपोर्ट करू शकता.

यानंतर नॅशनल सायबर सेल योग्य ती कारवाई करेल. या ट्विटमध्ये एसबीआयने आपल्या इंटरनेट बँकिंगची सुद्धा लिंक दिली आहे. एसबीआय ऑनलाइन बँकिंगची सर्व्हिस वापरण्यासाठी ग्राहक या पोर्टलद्वारे एसबीआय बँकिंग सर्व्हिसचा लाभ घेऊ शकतात. एसबीआयने सांगितले की, अधिकृत पोर्टलद्वारेच बँकिंग सेवांचा लाभ घ्या, असे न केल्यास तुमची फसवणूक होऊ शकते.

नॅशनल सायबर क्राइम रिपोर्टिंग पोर्टल केंद्र सरकारद्वारे संचालित केले जाणारे पोर्टल आहे, जेथे तुम्ही सायबरसंबधी तक्रार नोंदवू शकता. या पोर्टलवर महिला आणि मुलांवर होणार्‍या कोणत्याही सायबर क्राइमच्या विरोधात तक्रार करता येते.

या सरकारी पोर्टलवर तक्रार नोंदवण्यासाठी दोन पर्याय आहेत. पहिल्या पर्यायात मुले किंवा महिला कोणत्याही सायबर क्राइम विरोधात तक्रार नोंदवू शकतात. दुसर्‍या पर्यायात अन्य सर्वप्रकारच्या सायबर क्राइमचा रिपोर्ट केला केला जाऊ शकतो. बँकिंग फ्रॉडच्या प्रकरणात तुम्हाला दुसरा पर्याय निवडावा लागेल.

सायबर क्राइम पोर्टलवर अशी करा तक्रार
या दुसर्‍या पर्यायाद्वारे तक्रार करण्यासाठी तुम्हाला तुमच्या राज्याचे नाव, लॉगिन आयडी, मोबाइल नंबर आणि ओटीपी टाकावा लागेल. जर तुम्ही नवीन युजर असाल तर सर्वप्रथम या पोर्टलवर स्वताला रजिस्टर करावे लागेल.

नवे युजर म्हणून रजिस्टर करण्यासाठी तुम्हाला तुमचा मोबाइल नंबर द्यावा लागेल. ज्यानंतर तुमच्या मोबाइल नंबरवर एक ओटीपी पाठवला जाईल. ओटीपी भरल्यानंतर सबमिट केल्यानंतर रजिस्ट्रेशनचे काम पूर्ण होईल. यानंतर तुम्ही तुमची तक्रार नोंदवू शकता. हे काम अवघ्या काही मिनिटात पूर्ण होईल.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like