State Bank of India  बँकेचे डेबिट कार्ड बंद होणार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था

जर तुम्ही SBI बँकेचे ग्राहक असाल तर सावधान कारण एसबीआयचे जुने मॅग्नेटिक डेबिट कार्ड लवकरच बंद होणार असल्याचे भारतीय स्टेट बँकेने ग्राहकांस कळविले आहे. एसबीआयने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन याबाबत माहिती दिली आहे. एसबीआयकडून जुन्या एटीएम डेबिट कार्डसंदर्भात महत्त्वाचे पाऊल उचलण्यात येणार आहे. एसबीआयचे सध्या वापरात असलेले  मॅग्नेटिक डेबिट कार्ड लवकरच बंद होणार आहे.  २०१९साल सुरु होण्याच्या आधी डेबिट कार्ड बदलून घेण्याचे आवाहन बँकेने ग्राहकांना करण्यात आले आहे.
[amazon_link asins=’B01FM7GGFI’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’2ff236e4-9d74-11e8-bed2-b5a273187ad1′]

देशातील सर्वात मोठी बँक असल्याने आणि सुरक्षेच्या दृष्टीने  डेबिट कार्ड बदलण्याची सूचना केली आहे.  रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या सुचनेनुसार हा बदल करण्यात येत असल्याचेही आरबीआयने स्पष्ट केले आहे. कार्ड बदलण्यासाठी कोणतेही शुल्क पडणार नाही,  तसेच ही प्रकिया पूर्णपणे सुरक्षित असल्याचेही एसबीआयने म्हटले आहे. ज्या ग्राहकांकडे मॅग्नेटिक डेबिट कार्ड आहे, त्या ग्राहकांना ईएमव्ही चीप डेबिट कार्डद्वारे 31 डिसेंबर पर्यंत आपले डेबिट कार्ड बदलावे लागणार आहे. जर, ग्राहकाने 31 डिसेंबरपर्यंत तुमचे डेबिट कार्ड न बदलल्यास, त्यानंतर जुन्या डेबिट कार्डने एकही व्यवहार करता येणार नसल्याचेही एसबीआयकडून सांगण्यात आले आहे.  31 डिसेंबरनंतर कुठल्याही बँक किंवा एटीएम मशिनमध्ये ग्राहकांचे जुने डेबिट कार्ड अक्टिव्ह राहणार नाही. असं एसबीआयच्या माहितीनुसार समजले आहे.
[amazon_link asins=’B077PWBC7J’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’3530fcb5-9d74-11e8-b20b-55740f4a2464′]
दरम्यान, मागील काही महिन्यात एसबीआयमध्ये 6 सहयोगी बँकांचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे एसबीआय ग्राहकांची संख्या वाढून  32 कोटींपर्यंत पोहोचली आहे. तर कोट्यवधी लोकांनी आपले जुने डेबिट कार्ड देऊन, नवीन डेबिट कार्डसाठी अर्ज केला आहे.