SBI खातेधारकांना मोठा दिलासा ! आता घरी बसल्या मिळणार ‘या’ सर्व सुविधा, जाणून घ्या कोणत्या ग्राहकांना होईल फायदा
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जर आपण देखील स्टेट बँक ऑफ इंडियाचे ग्राहक असाल तर बँकेकडून आपल्याला अनेक सुविधा घरी बसल्या उपलब्ब्ध करून दिल्या जातात. म्हणजेच, त्या सर्व कामांसाठी आपल्याला बँकेत जाण्याची आवश्यकता नाही. स्टेट बँक आपल्या ग्राहकांना डोअरस्टेप बँकिंग प्रदान करते. या सुविधेमध्ये आपल्याला बँकेकडून नॉन फायनॅन्शियल सर्व्हिसेस जसे कि चेक, डिमांड ड्राफ्ट, पे ऑर्डर इत्यादींचे पिक अप, अकाउंट स्टेटमेंट रिक्वेस्ट, टर्म डिपॉझिट रिसीट घरी पोहोचविल्या जातात. जाणून घेऊया या बँकिंगच्या वैशिष्ट्याबद्दल –
SBI दिली माहिती
एसबीआयच्या अधिकृत संकेतस्थळावर दिलेल्या माहितीनुसार, ग्राहकांना बँकेच्या वतीने रोख संकलन, रोख वितरण, चेक रिसीव करणे, चेकची मागणी, रिसीट घेणे, जीवन प्रमाणपत्र, केवायसी कागदपत्रांचे पिकअप, ड्राफ्टची डिलिव्हरी, फॉर्म 15 पिकअप सारख्या बर्याच सुविधा आहेत.
किती रोकड मागवू शकतो ?
भारतीय स्टेट बँकेची किमान मर्यादा 1000 रुपये आणि कमाल मर्यादा 20,000 रुपये आहे. रोकड पैसे काढण्यासाठी, विनंती करण्यापूर्वी बँक खात्यात पुरेसा शिल्लक ठेवणे अनिवार्य आहे. जर हे केले नाही तर व्यवहार रद्द केला जाईल.
डोअरस्टेप बँकिंग सेवा म्हणजे काय ?
डोरस्टेप बँकिंग सेवेद्वारे ग्राहक धनादेश जमा करणे, पैसे काढणे आणि पैसे जमा करणे, जीवन प्रमाणपत्र घेणे यासारख्या अनेक सुविधांचा लाभ घेऊ शकतात. ही सेवा 70 वर्षांवरील वृद्ध, अपंग आणि दृष्टिबाधित लोकांना त्यांच्या घरी बँकिंग सेवा मिळविण्यास मदत करेल. डोरस्टेप सर्विस अंतर्गत, एक बँक कर्मचारी आपल्या घरी येईल आणि आपला कागद घेऊन तो बँकेत जमा करेल.
कोणत्या ग्राहकांना डोर स्टेप बँकिंगचा लाभ मिळणार नाही –
– संयुक्त खाते असलेले ग्राहक
– मायनर अकाउंट
– गैर – वैयक्तिक खाते
या सुविधेचा कसा घ्यावा फायदा
बँकेच्या मोबाइल अॅप्लिकेशन, वेबसाइट किंवा कॉल सेंटरच्या माध्यमातून कोणीही डोरस्टेप बँकिंग सेवेसाठी नोंदणी करू शकतो. त्याशिवाय कामकाजाच्या दिवशी सकाळी 9 ते सायंकाळी 4 या वेळेत टोल फ्री क्रमांकावर 1800111103 वर कॉल करता येईल. एसबीआय डोअरस्टेप बँकिंग सेवांविषयी अधिक माहितीसाठी, ग्राहक https://bank.sbi/dsb वर भेट देऊ शकतात. तसेच ग्राहक त्याच्या गृह शाखेशी देखील संपर्क साधू शकतो.