खुशखबर ! PM-Kisan योजनेचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांना मिळणार क्रेडिट कार्ड, SBI ने दिली माहिती

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  केंद्र सरकारने पंतप्रधान शेतकरी योजनेचा लाभ घेणाऱ्या २.५ कोटी शेतकऱ्यांना क्रेडिट कार्ड (KCC) देण्याचा निर्णय घेतला आहे. शेतकऱ्यांना KCC च्या माध्यमातून खत, बियाणांसाठी कर्ज सहज उपलब्ध होतं. यावर लागणारं व्याजही गतिशील असतं. म्हणजे, जर कर्ज घेणारे शेतकरी वेळेवर कर्ज परत करतात त्यांच्याकडून अल्प व्याज घेतलं जातं. शेतकरी केसीसीच्या माध्यमातून तुम्ही १.६० लाख रुपयांपर्यंतचं कर्ज विना गॅरंटी घेऊ शकता. या कार्डवर शेतकरी ३ लाख रुपयांपर्यंतचं कर्ज घेऊ शकतात. भारतातील सर्वात मोठी बँक स्टेट बँक ऑफ इंडियाने (SBI) केसीसीविषयी सविस्तर माहिती दिली आहे.

केंद्र सरकारनं KCC बनवण्याची प्रक्रिया पहिल्यापेक्षा सोपी केली आहे. यासाठी लागणारं प्रक्रिया शुल्क रद्द करण्यात आलं आहे. बँकांना गावांगावामध्ये कँम्प लावण्याचे आदेश देण्यात आले आहेत. पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजना आणि केसीसी स्कीमला लिंक केल्यानंतर देशातील १.५ कोटी शेतकऱ्यांना KCC देण्यात आलं आहे. तसेच केंद्र सरकारच्या निर्णयामुळे बँका शेतकऱ्यांना KCC देण्यास मनाई करु शकत नाहीत.

SBI कार्डाचे वैशिष्ट्ये-

KCCच्या खात्यातील क्रेडिट रकमेवर सेव्हिंग्ज खात्याच्या दरानं व्याज दिलं जातं.
किसान क्रेडिट कार्डधारकांना मोफत ATM,डेबिट कार्ड दिले जाईल.
३ लाख रुपयांच्या कर्जाला २ टक्के व्याजदरात सूट.
वेळेत कर्ज परतफेड केल्यास 3 टक्के व्याजदरात सूट.

१.६० लाखांपर्यंत विनातारण कर्ज-

KCC वरील कर्ज अनूसूचित केलेले पीक, पीक विमा असणाऱ्या पिकांना दिलं जातं.
पहिल्या वर्षातील कर्जासाठी उत्पादन खर्च आणि पीक काढणीच्या खर्चावर आधारित कर्ज दिलं जातं.
५ वर्षांतील आर्थिक व्यवहार पाहून कर्ज रक्कम निर्धारितकेली जाते.
१.६० लाखापर्यंतचं कर्ज विनातारण दिलं जाते.
परतफेड कालावधी संपल्यानंतर चक्रवाढ पद्धतीनं व्याज आकारलं जातं.

आवश्यक कागदपत्रे-

विहीत नमुन्यातील अर्ज

ओळखपत्र (ID card) म्हणून मतदार कार्ड, पासपोर्ट, आधारकार्ड आणि ड्रायव्हिंग लायसन्स

शेतकरी

खंडानं जमीन करणारे शेती गट