State Bank of India | कामाची गोष्ट ! बँकेत ‘फाटलेल्या’ अन् ‘कुजलेल्या’ नोटा बदलून मिळतात, पण प्रत्येक नोटसाठी द्यावं लागतं ‘एवढं’ शुल्क, जाणून घ्या

नवी दिल्ली : State Bank of India | आरबीआयनुसार फाटक्या, जुन्या नोटा बँकेत जाऊन बदलता येऊ शकतात. बँक यासाठी एक चार्जसुद्धा वसूल करते आणि त्यानंतर नोटा बदलून देते. अशा नोटा बदलण्यासाठी बँक किती फी घेते तसेच जुन्या, फाटक्या नोटांबाबतचे नियम आपण जाणून घेवूयात…

अशा बदलून घ्या नोटा

नोटेची स्थिती पाहून ठरवले जाते की, एका नोटेचे किती रुपये लागतील. समजा 2000 रुपयाच्या नोटेचा 88 वर्ग सेंटीमीटर (सीएम) भाग असल्यास संपूर्ण पैसे मिळतील. परंतु 44 वर्ग सीएमवर निम्मीच किंमत मिळेल. अशाप्रकारे 200 रुपयांच्या फाटक्या नोटेत 78 वर्ग सीएम भाग दिल्यास पूर्ण पैसे मिळतील, पण 39 वर्ग सीएमवर निम्मे पैसे मिळतील. सोबतच नोटेच्या आधारावर अवलंबून आहे.

किती चार्ज लागतो?

जर तुमच्याकडे 20 नोटा आहेत आणि त्यांची व्हॅल्यू 5000 रुपयांपेक्षा कमी आहे तर तुम्हाला कोणताही चार्ज लागणार नाही. जर 20 पेक्षा जास्त नोट आहेत आणि त्यांची व्हॅल्यू सुद्धा 5000 पेक्षा जास्त आहे तर तुम्हाला चार्ज द्यावा लागेल. अशावेळी 20 पेक्षा जास्त नोटा असल्यास एक नोटवर दोन रुपये चार्ज आणि जीएसटी भरावा लागेल. जर त्यांची व्हॅल्यू 5000 पेक्षा जास्त आहे तर 2 रुपये प्रति नोट किंवा 5 रुपये प्रति 5000 रुपयांच्या हिशेबाने पैसे वसूल केले जातील. यामध्ये जे जास्त असेल तो जार्च घेतला जाईल.

कोणत्या नोटा बदलल्या जाणार नाहीत

आरबीआयचे म्हणणे आहे की, जर तुमची नोट नकली नसेल तर बदलून मिळेल. जुन्या, फाटक्या
नोटा सहज बदलून मिळू शकतात. यासाठी कोणतेही शुल्क नाही, परंतु जळलेल्या किंवा तुकडे
झालेल्या नोटा बदलून मिळणार नाहीत. जर बँक अधिकार्‍याला वाटले की नोट जाणिवपूर्वक फाडली
किंवा कापली आहे तर नोट बदलून देण्यास नकार दिला जाऊ शकतो.

हे देखील वाचा

FYJC | राज्यात 10 वीचा निकाल 15 जुलैपर्यंत, 11 वी प्रवेशासाठी CET ची घोषणा

साताऱ्यात गटशिक्षणाधिकाऱ्याची विधवा शिक्षिकेकडे शरीरसुखाची मागणी, शिक्षण क्षेत्रात प्रचंड खळबळ

मुंबई HC ची ठाकरे सरकारला सूचना, म्हणाले – ‘वकिलांना लोकलमधून प्रवासास मुभा देण्याबाबत 1 जुलैपर्यंत निर्णय घ्या’

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel : state bank of india know about charges for imperfect notes and how can you change notes know about it

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update