हक्काचं घर हवंय ? तर SBI देतंय स्वस्तात घर; जाणून घ्या सविस्तर माहिती

नवी दिल्ली : प्रत्येकाला आपल्या हक्काचं घर हवं असतं. त्यासाठी अनेकजण कर्ज काढतात तर काही सेव्हिंगच्या माध्यमातून पैसे देऊन घर खरेदी करतात. तुम्हालाही तुमच्या हक्काचं घर हवं असेल तर तुमच्यासाठी ही बातमी महत्वाची आहे. कारण आता भारतीय स्टेट बँकेने (SBI) त्यांच्या ताब्यातील घरांचा लिलाव करण्याचा निर्णय घेतला आहे.

देशातील सर्वात मोठी बँक स्टेट बँक मालमत्तेचा लिलाव करत आहे. हा मेगा ऑक्शन (e-Auction) 5 मार्चपासून सुरु केला जाणार आहे. यावेळी करण्यात आलेल्या लिलावात सुमारे 1000 पेक्षा जास्त प्रॉपर्टीसाठी बोली लावता येऊ शकते. यामध्ये रेसिडेन्शिअल, इंडस्ट्रिअल, कमर्शिअल आणि ऍग्रीकल्चर प्रॉपर्टीचा समावेश आहे. त्यामुळे या लिलावाच्या माध्यमातून कमी पैशांत प्रॉपर्टी खरेदी करण्याचे स्वप्न पूर्ण होऊ शकते.

Default Property चा लिलाव

प्रॉपर्टीचे मालक ज्यांनी कर्ज फेड केली नाही. अशा लोकांची जमीन किंवा इतर प्रॉपर्टी बँकेकडून जप्त केली जाते. ही थकित रक्कम वसूल करण्यासाठी प्रॉपर्टीचा लिलाव केला जातो. SBI कडून वेळोवेळी अशा जप्त प्रॉपर्टीचा लिलाव केला जातो.

या लिंकवरून घ्या माहिती

लिलावासंदर्भात सर्व माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही https://www.bankeauctions.com/Sbi या वेबसाईटवर भेट देऊन अधिक माहिती घेऊ शकता. याशिवाय https://ibapi.in/ माध्यमातूनही माहिती घेऊ शकता. तसेच SBI कडून हेल्पलाईन नंबर – 033 40602403/40067351/40628253/40645316/40645207/40609118 वर फोन करूनही सविस्तर माहिती घेता येऊ शकते.