SBI च्या ग्राहकांसाठी खुशखबर ! ‘या’ 7 स्टेप्स फाॅलो करून घर बसल्या बदला बँकेची शाखा, जाणून घ्या
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सर्वात मोठी सरकारी बँक असलेली एसबीआय नेहमी आपल्या ग्राहकांसाठी विविध सुविधा आणत असते. बँकेत झिरो बॅलन्स अकाउंट देखील उपलब्ध आहे. त्याचबरोबर अनेक सुविधा ह्या घरबसल्या पुरवण्याचा बँकेचा प्रयत्न असतो. त्यानंतर आता बचत खाते ऑनलाईन ट्रान्स्फर सुरु करण्याची सुविधा बँकेने सुरु केली आहे. आधी यासाठी ग्राहकांना बँकेत जावे लागत असे. मात्र आता या पद्धतीमुळे काही मिनिटांतच ग्राहक हे काम करू शकणार आहेत. या सुविधेमार्फत तुम्ही तुमचे बचत खाते थेट दुसऱ्या बँकेत ऑनलाईन ट्रान्सफर करू शकणार आहात.
यासाठी बँकेने आपल्या इंटरनेट बँकिंगमध्ये काही पर्याय दिले असून तुम्ही खालील क्रमाने या सुविधेचा लाभ घेऊ शकता.
1) तुम्ही लॉग-इन केल्यानंतर होम पेजवर तुम्हाला e-Services या पर्यायावर क्लिक करायचे आहे.
2) या पर्यायावर क्लिक केल्यानंतर ‘Transfer of Savings Account’ हा पर्याय निवडायचा आहे.
3) यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमच्या अकाउंट्सचे सर्व डिटेल्स दिसतील. त्यानंतर तुम्हाला कोणते
अकाउंट ट्रान्सफर करायचे आहे ते निवडावे लागेल.
4) तुम्हाला ज्या शाखेत हे अकाउंट ट्रान्सफर करायचे आहे त्याचा कोड तुम्हाला याठिकाणी टाकावा लागणार आहे. त्यानंतर शाखेची माहिती येईल.
5) नियम आणि अटी यांचा स्वीकार केल्यानंतर तुम्हाला सबमिट हे बटन दाबावे लागणार आहे. सर्व काम पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला कन्फर्म हे बटन दाबायचे आहे.
6) तुम्ही कन्फर्म हे बटन दाबल्यानंतर तुमच्या मोबाईलवर एक सेक्युरिटी कोड येईल. हा कोड टाकल्यानंतर तुमची प्रक्रिया पूर्ण होईल.
7) तुमची हि प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला तुमचे अकाउंट ट्रान्सफर झाल्याचा मॅसेज येईल.
Visit – policenama.com
- रोज १ आवळा खाल्ल्यास शरीरावर होतील ‘हे’ ९ चांगले प्रभाव
- नियमित प्या ‘गहू तृणरस’, संधीवातासह ‘हे’ १० आजार होतील दूर, जाणून घ्या
- रात्री उशीखाली ठेवा एक ‘लसणाची पाकळी’ आणि मग पाहा चमत्कार!
- ‘किडनी ट्रांसप्लांट’नंतर अशी घेतली जाते काळजी, निरोगी ठेवण्यासाठी ‘हे’ करा
- ‘या’ १० सौंदर्य समस्या करा दूर, नाही पैशांची आवश्यकता, अवश्य करा ‘हे’ उपाय
- या लोकांनी टाळावे ‘चायनीज फूड’! खात असाल, तर हे आवश्य जाणून घ्या
- प्राचीन उपायांनी वाढवा सौंदर्य, वर्षानुवर्षे होतोय वापर, ‘हे’ १० पदार्थ उपयोगी
- छोटी विलायचीत अनेक औषधी गुणधर्म, होतील ‘हे’ ५ आरोग्यदायी फायदे
- प्रवास करताना उलटी का होते? ‘हे’ ५ उपाय केल्यास मिळेल आराम, जाणून घ्य
- झोपण्यापुर्वी पुरुषांनी प्यावे यापैकी एक ड्रिंक, होतील ‘हे’ ७ खास फायदे
- हे जेवणानंतर खा फक्त दोन चिमुट,आरोग्यसंबंधित होतील अनेक फायदा