खुशखबर ! SBI चे खातेदार ‘या’ अटीवर करू शकतात ATM चा ‘अनलिमीटेड फ्री’ वापर, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशातील सर्वात मोठी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाने आपल्या ग्राहकांसाठी नवीन खुशखबर आणली आहे. याआधी बँक आपल्या ग्राहकांना एका महिन्यात ८ ते १० एटीएम व्यवहार करण्याची सुविधा देत होती. मात्र यापुढे आता ग्राहकांना अनिलिमिटेड फ्री एटीएम व्यवहार करण्याची सुविधा देखील देणार आहे. मात्र यासाठी ग्राहकांना काही अटींची पूर्तता करावी लागणार आहे.

या अटी कराव्या लागणार पूर्ण

१) खात्यात ठेवावा लागणार मिनिमम बॅलन्स-

जर तुम्हाला महिन्याला अनलिमिटेड फ्री एटीएम व्यवहार करायचे असतील तर तुम्हाला तुमच्या बँक खात्यात कमीत कमी १ लाख रुपये ठेवावे लागणार आहे. त्यानंतर तुम्ही या सेवेचा लाभ घेऊ शकता. आरबीआयने याआधी बँकांना विशिष्ठ फ्री एटीएम व्यवहार देण्याचे आदेश दिले होते.

२) मंथली एटीएम व्यावहाराचे हे आहेत नियम-

सध्या एसबीआय आपल्या ग्राहकांना महिन्याला ८ मंथली एटीएम व्यवहार मोफत देते. यामध्ये ५ एसबीआय तर ३ इतर बँकांमधून करू शकता. मात्र तुम्हाला त्यानंतरही एटीएम वापरायचे असेल तर प्रत्येक व्यावहारानंतर तुम्हाला ५ रुपयापासून २० रुपयांपर्यंत व्यवहार फी आकारण्यात येतील.

३) १० मोफत व्यवहार –

कमीत कमी २५ हजार रुपये खात्यात असणाऱ्या व्यक्तीला स्‍टेट बँक ऑफ इंडियाच्या कोणत्याही एटीएममधून महिन्याला १० वेळा मोफत व्यवहार करता येते. त्यानंतर मात्र जास्तीचे पैसे आकारण्यात येतात.

You might also like