SBI च्या ग्राहकांसाठी खुशखबर ! गृह – वाहन कर्जाच्या EMI मध्ये होणार ‘इतकी’ घट

नवी दिल्ली : वृत्त संस्था – देशातील सर्वात मोठी बँक स्टेट बँक ऑफ इंडियाने (SBI) ग्राहकांना मोठी भेट दिली आहे. एसबीआयने चालू आर्थिक वर्षात सलग आठव्यांदा मार्जिनल कॉस्ट ऑफ लेंडिंग रेट (MCLR) मध्ये कपात करण्याची घोषणा केली आहे. बँकेने जारी केलेल्या निवेदनात म्हटले की, सर्व कालावधीसाठी MCLR मध्ये १० बेसिस पॉईंट म्हणजेच ०.१० टक्क्यांनी कपात करण्यात आली आहे. दरम्यान, नवीन दर १० डिसेंबर २०१९ पासून लागू होतील.

किती कमी होणार EMI –
एसबीआयने MCLR वर आधारित कर्जाचे दर कमी केले आहेत. आता EMI दरमहा ०.१०% स्वस्त झाला आहे. हा दर ८ टक्क्यांवरून ७. ९० टक्क्यांवर आला आहे. एसबीआयने जारी केलेल्या अहवालात म्हंटले कि, एसबीआय व्याज दरात कपात केल्यामुळे देशात स्वस्त दराने कर्ज उपलब्ध करून देणारी बँक बनली आहे.

यापूर्वी नोव्हेंबरमध्येही एसबीआयने MCLR मध्ये बदल केले होते. तर एसबीआयने एक वर्षासाठी MCLR मध्ये ०.०५ टक्क्यांनी कपात केली. त्यानंतर हा दर ८.०५ टक्क्यांवरून ८ टक्क्यांवरून घसरला. रिझर्व्ह बँकेने यंदा आतापर्यंत रेपो दरात १. ३५ टक्के कपात केली आहे. एसबीआयने ग्राहकांना त्याचा लाभ देण्यासाठी व्याज दरात कपात केली आहे.

MCLR कमी झाल्यामुळे आपल्याला मिळणार थेट लाभ –
बँकांद्वारे एमसीएलआर वाढविणे किंवा कमी करण्याचा फायदा नवीन कर्जदारांना तसेच एप्रिल २०१६ नंतर कर्ज घेतलेल्या ग्राहकांना होणार आहे. दरम्यान, एप्रिल २०१६ पूर्वी रिझर्व्ह बँकेने कर्जासाठी निश्चित केलेला किमान दरास ‘बेस रेट’ असे म्हणतात. म्हणजेच बँका कमी दराने ग्राहकांना कर्ज देऊ शकत नव्हते. १ एप्रिल २०१६ पासून बँकिंग प्रणालीमध्ये MCLR लागू झाला असून कर्जाचा किमान दर ठरला आहे. २०१९-२०२० या आर्थिक वर्षातील आठव्या वेळी एसबीआयने आपले MCLR दर कमी केले आहेत.

Visit : Policenama.com