SBI मध्ये ‘या’ पदांसाठी मेगाभरती, अर्ज करण्यासाठी फक्त 3 दिवस शिल्लक

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –  जर तुम्ही ग्रॅज्युएट, पोस्ट ग्रॅज्युएट, इंजिनिअर, एमबीए, पीजीडीएम किंवा सीए असाल तर तुम्हाला भारतीय स्टेट बँकेत नोकरी करण्याची संधी मिळणार आहे. एसबीआयने अनेक पदांची भरती प्रक्रिया सुरु केली आहे. बँकेने कॅडर ऑफिसर्सच्या वेगवेगळ्या पदांसाठी अर्ज मागवले आहेत. या पदांसाठी अर्ज करण्यासाठी अखेरचे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. जाणून घ्या कोणत्या पदांसाठी भरती प्रक्रिया आहे आणि कधी पर्यंत करायचा अर्ज.
पदाची माहिती

1. एसएमई क्रेडिट अ‍ॅनालिस्ट -20 पदं
2. प्रोडक्ट मॅनेजर – 6 पदं
3. मॅनेजर (डाटा अ‍ॅनालिस्ट)- 2 पद
4. मॅनेजर (डिजिटल मार्केटिंग) – 1 पद
5. फॅकल्टी, एसबीआयएल, कोलकाता – 3 पदं
6. सिनिअर एक्झिक्यूटिव्ह (डिजिटल रिलेशन्स) – 2 पदं
7. सिनिअर एक्झिक्यूटिव्ह (अ‍ॅनालिटिक्स) – 2 पदं
8. सिनिअर एक्झिक्यूटिव्ह (डिजिटल मार्केटिंग) – 2 पदं
9. बँकिंग सुपरवायजरी स्पेशलिस्ट- 1 पद
10. मॅनेजर (एनिटाईम चॅनल) – 1 पद
11. डिप्टी मॅनेजर (आयएस ऑडिट) – 8 पदं
12. वाईस प्रेसिडेंट (स्ट्रेस्ड असेट्स मार्केटिंग) – 1 पद
13. चीफ मॅनेजर ( स्पेशल सिच्युएशन टीम) – 3 पदं
14. डिप्टी मॅनेजर (स्ट्रेस्ट असेट्स मार्केटिंग) – 3 पदं
15. हेड (प्रोडक्स, इनव्हेस्टमेंट अँड रिसर्च) – 1 पद
16. सेंट्रल रिसर्च (पोर्टफोलिओ अ‍ॅनालिसिस अँड अॅनालिटिक्स)- 1 पद
17. सेंट्रल रिसर्च टीम (सपोर्ट) – 1 पद
18. इनव्हेस्टमेंट ऑफिसर – 9 पदं
19. प्रोजेक्ट डेव्हलपमेंट मॅनेजर (टेक्नॉलॉजी) – 1 पद
20. रिलेशनशिप मॅनेजर – 48 पदं
21. रिलेशनशिप मॅनेजर (टीम लीड) – 3 पदं
एकूण पदांची संख्या – 119
स्टेट बँक ऑफ इंडियाच्या या पदांसाठी ऑनलाइन पद्धतीनं अर्ज करावा लागणार आहे. अर्जाची प्रक्रिया 23 जूनपासून सुरु झाली आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 जुलै आहे. अधिक माहितीसाठी https://sbi.co.in/web/careers/current-openings या संकेतस्थळाला भेट द्यावी.