SBI कडून व्याज दरात मोठी ‘कपात’, तुमच्या गृह कर्जाचा EMI होणार ‘एवढा’ कमी, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशातील सर्वात मोठी बँक एसबीआयने मंगळवारी सर्व एमसीएलआरमध्ये 0.35 टक्क्यांची कपात करण्याची घोषणा केली आहे. यासह बँकेचा एक वर्षाचा एमसीएलआर 7.75 टक्क्यांवरून 7.40 टक्क्यांपर्यंत खाली आला आहे. बँकेने केलेली ही कपात 10 एप्रिल 2020 पासून लागू होणार आहे. बँकेने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात ही माहिती देण्यात आली आहे. यापूर्वी बॅंकेने बाह्य बेंचमार्क आधारित कर्जावरील व्याजदरातही मोठी कपात केली होती.

बँकेकडून मार्जिनल कॉस्ट ऑफ फंड बेस्ड लेन्डिंग रेट (एमसीएलआर) मध्ये कपात करणे फार महत्वाचे आहे कारण यामुळे बँकेकडून गृहकर्जांसारखे कर्ज घेणाऱ्या ग्राहकांच्या ईएमआयमध्ये घट होईल.

एसबीआयने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, ‘या कपातीसोबत एमसीएलआरला जोडलेल्या 30 वर्षाच्या गृह कर्जाची ईएमआय प्रति लाखाच्या हिशोबाने 24 रुपयाने कमी केली जाईल.”