SBI च्या 40 कोटी ग्राहकांना ‘झटका’ ! आता बँकेकडून ‘सेव्हिंग’ अकाऊंटवरील व्याजदरात ‘कपात’
नवी दिल्ली, वृत्तसंस्था – देशातील सर्वात मोठी बँक असलेल्या भारतीय स्टेट बँकेने आपल्या कोट्यावधी ग्राहकांना मोठा झटका देत बचत खात्यावरील व्याज दरात घट करण्याचा महत्वपूर्ण निर्णय दिला आहे. बँकेकडून सांगण्यात आले आहे, खात्यावर जमा एक लाख रुपयांवर आता 0.25 टक्क्यांनी कमी व्याज मिळेल. याचा फटका एसबीआयच्या 40 कोटी ग्राहकांंना बसणार आहे. एसबीआयने बचत बँक खात्यावरील आपल्या व्याज दराला तर्कसंगत करत सरसकट 3 टक्के वर्षाला केले आहे.
एसबीआयचा निर्णय –
बँकेच्या सर्व बचत खातेदारांना बचत खात्यावर व्याज दराच्या तर्कसंगत करत सरसकट 3 टक्के केले आहे. यापूर्वी, 1 लाख रुपयांपेक्षा कमी बचत खात्यावर व्याज दर 3.25 टक्के होते, तर 1 लाख रुपयांपेक्षा जास्त रक्कमेवर व्याज 3 टक्के होते.
एफडीवरील दरात मागील आठवड्यात कपात –
मागील आठवड्यात एसबीआयने फिक्स्ड डिपॉजिटवरील व्याजात कपात केली आहे. महिन्याच्या आता पुन्हा एकदा व्याज दरात कपात केली. बँकेने 45 दिवसांपर्यंत असलेल्या कालावधी साठी शॉर्ट टर्म एफडीवर व्याज दरात 0.50 टक्क्यांची कपात केली आहे, जे 10 मार्चपासून लागू होतील. नव्या व्याज दरानुसार 7 ते 45 दिवसांच्या एफडीवर 4 टक्के व्याज मिळेल. जो पहिले 4.50 टक्के होता. याशिवाय 1 वर्ष आणि त्यापेक्षा जास्त कालावधीसाठी एफडीच्या व्याज दरांमध्ये 0.10 टक्क्यांपर्यंत कपात केली गेली. यावर पहिल्यांदा 6 टक्क्यांपर्यंत व्याज मिळत होते.
गृह कर्जाच्या व्याजदरात कपात –
एसबीआयच्या व्याज दरात कपात केली आहे. बँकेने मार्जिनल कॉस्ट ऑफ फंड्स बेस्ड लेंडिंग रेट (MCLR) मध्ये 15 अंकांची कपात केली. हे दर 10 मार्चपासून लागू होतील.