SBI ग्राहकांना अलर्ट ! 28 फेब्रुवारीपर्यंत ‘हे’ कामकेलं नाही तर अकाऊंट होईल ‘ब्लॉक’, पैसे काढता नाही येणार, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये तुमचं खातं असेल तर ही बातमी तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. आरबीआयने सगळ्या बँक खात्यासाठी केवायसी (KYC) तपशील करणं बंधनकारक केले आहे. जर केवायसी केले नसेल तर बँक खातं उघडणं आणि पैसे गुंतवता येणार नाहीत. एवढेच नाही तर हा तपशील दिला नाही तर खात्यामधले बँक व्यवहार रोखले जाऊ शकतात. याच संदर्भात एसबीआयने आपल्या सर्व ग्राहकांना एसएमएस (SMS) पाठवून अलर्ट दिला आहे. ग्राहकांनी आपला केवायसी तपशील अपडेट केला नाही तर खातं बंद होणार आहे, असा अलर्ट देण्यात आला आहे. आपला केवायसी तपशील देण्यासाठी एसबीआयने 28 फेब्रुवारी ही शेवटची तारीख दिली असून आपला केवायसी तपशील देण्यासाठी केवळ आठ दिवस राहिले आहेत.

केवायसी (KYC) म्हणजे काय ?
केवायसी म्हणजे Know Your Customer म्हणजे आपल्या ग्राहकांबाबत पूर्ण माहिती असणे. केवायसी करणं जरुरी आहे कारण त्यामुळे बँक आणि ग्राहकांमधील व्यवहार सुलभ होतात. केवायसी अपडेट करण्याकरता ग्राहकांना आपल्या जवळच्या एसबीआयच्या शाखेत जाऊन आपली अद्यावत कागद पत्रे द्यावी लागतील. अगर तुम्ही असे केले नाही तर भविष्यात तुमचे बँक व्यवहार रोखले जातील किंवा फ्रिज केले जाईल.

केवायसी (KYC) साठी लागणारी कागदपत्रे
एसबीआय (SBI) च्या वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार, केवायसीसाठी ग्राहकांना आपलं ओळखपत्र द्यावे लागेल. यामध्ये पासपोर्ट, व्होटर आयडी कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, आधार कार्ड, नरेगा कार्ड, पेन्शन, पोस्ट ऑफिसची कागदपत्रांचा समावेश आहे. विद्यार्थ्यांना त्यांच्या पालकांचे ओळखपत्र आणि पत्त्याचं प्रमाणपत्र द्यावं लागणार आहे.

एसबीआयाने आपल्या वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार, केवायसीसाठी द्यावा लागणाऱ्या कागदपत्रांवर तोच पत्ता असणं अनिवार्य आहे जो बँकेतील खात्यासाठी भरलेल्या फॉर्ममध्ये असेल. त्यामुळे एसबीआय ग्राहकांनी बँकेकडून आलेल्या मेसेज गांभीर्याने वचणं आणि त्या प्रमाणे कागदपत्र जवळच्या शाखेत जमा करणं गरजेच आहे.