SBI चा अलर्ट ! पूरग्रस्तांना बँक खात्यातून मदत करताना ‘रिकामं’ होऊ शकतं अकाऊंट, ‘ही’ काळजी घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशभरात सध्या पुराने मोठ्या प्रमाणात थैमान घातले असून मोठ्या प्रमाणात नागरिकांचे नुकसान आले आहे. करोडो रुपयांच्या मालमत्तेचे नुकसान झाले असून नागरिकांना मदत करण्याचे सरकारने आवाहन केले असून मोठ्या प्रमाणावर नागरिक मदतीसाठी पुढे देखील येत आहेत. नागरिक आपल्या बँक खात्यातून हे पैसे पूरग्रस्त सहाय्यता निधीमध्ये पैसे देत आहेत. मात्र अशा प्रकारे मदत करणाऱ्या आपल्या ग्राहकांना एसबीआयने सावध केले आहे. जर तुम्ही या पीडितांना मदत करत असाल तर काही गोष्टींची काळजी घेण्याचे आवाहन SBI ने आपल्या ग्राहकांना केले आहे.

SBI

असे वाचा धोक्यापासून
एसबीआयने आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे कि, जर तुम्ही पूरग्रस्तांना मदत करू इच्छित असाल तर पहिल्यांदा तुम्ही दान करणारे खाते हे ऑफिशियल रिलीफ फंड आहे कि, नाही हे तपासून पाहावे. यासाठी मदत करायची असल्यास त्याची आधी चौकशी करा. त्यानंतरच मदत करा. त्याचबरोबर ज्या खात्यात तुम्ही पैसे जमा करत आहात त्याची देखील खात्री करा.

काय करू करावे
1) कोणत्याही लिंकवर क्लिक करण्यापूर्वी सावधानता बाळगा. अज्ञात ई-मेल वरून आलेली लिंक उघडू नये.
2) कोणत्याही ई-मेलवर तुमच्या पासवर्डची माहिती देऊ नका.
3) पासवर्ड, पिन आणि गोपनीय माहिती कोणत्याही व्यक्तीला देऊ नये. याची माहिती बँकेतील अधिकाऱ्यांना देखील नसते.

काय करावे
1) प्रत्येक वेळी वेबसाईट सर्च करताना यूआरएल टाकूनच सर्चिंग करावे.
2) केवळ अधीकृत वेबसाईटवरच तुमचा आयडी आणि पासवर्ड टाकावा.
3) लक्षात ठेवा कि, बँक तुम्हाला फोन करून कधीही तुमच्या एटीएम कार्डचा पासवर्ड विचारात नाही. त्यामुळे सावध राहावे.

आरोग्यविषयक वृत्त-