नो-टेन्शन ! ATM कार्ड विसरलं तरी काढता येणार पैसे, स्टेट बँक देतय सुविधा, जाणून घ्या

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – बँक आपल्या ग्राहकांच्या सोयीसाठी अनेक सुविधा उपलब्ध करून देत असतात. त्यात डिजिटलायजेशन झाल्याने ग्राहकांचा मार्ग सुखकर झाला आहे. त्यामुळे सुरक्षीत आणि सुटसुटीत व्यवहारासाठी बँका आता नव-नवीन गोष्टीं समाविष्ट करत आहेत. त्यात ATM कार्ड ही दैनंदिन व्यवहारातील आवश्यक गोष्ट झाली आहे. मात्र ATM कार्ड चोरून त्याचा गैरवापर केल्याच्या अनेक घटना समोर येत आहेत. त्यामुळे स्टेट बँक ऑफ इंडिया आणि कॅनरा बँकेने पैसे काढण्याची नवीन कार्डलेस (Cardless transaction) सुविधा सुरू केली आहे. त्यामुळे तुमच्याकडे कार्ड नसलं तरी तुम्हाला पैसे काढता येणार आहे. मात्र त्यासाठी काही गोष्टींची काळजी घ्यावी लागेल.

SBI ने SBI YONO हे खास APP तयार केलंय. हे अ‍ॅप डाऊनलोड केल्यानंतर युझर आडी आणि पासर्वड टाकून नव्याने लॉगिंन करावं लागले.

१) – हे अ‍ॅप आपल्या मोबाईलमध्ये डाऊनलोड केल्यानंतर तुम्ही सहा अंकी पीनकोड सेट करू शकता. त्यानंतर होम स्किनवर तुम्हाला तीन पर्याय दिसतील. त्यातील शेवटचा पर्याय म्हणजेच ‘योनो कॅश’वर क्लिक करा. त्यानंतर पुन्हा नवे पर्याय दिसतील त्यात ‘एटीएम’, ‘मर्चेंट पीओएस’, ‘सीएसपी’ आणि कार्डलेस शॉपिंग असे पर्याय दिसतील.

२) – ATMमधून पैसे काढण्यासाठी तुम्हाला पहिला पर्याय निवडावा लागेल. त्यानंतर हव्या असणाऱ्या रकमेचा आकडा टाकावा लागेल. त्यानंतर सहा आकडी पीनकोड द्यावा लागेल. जो अंत्यंत गरजेचा आहे.

३) – त्यानंतर टर्म आणि कंडिशनवर कंन्फर्मवर टीक केल्यानंतर पाच आकडी कॅश ट्रांजेशन नंबर (CSN) मिळेल. त्यानंतर स्टेट बँकेच्या ATM केंद्रावर जावून SBI YONO वर क्लिक केलं की CSN नंबर टाकून पैसे काढता येतील. अशाच प्रकारची सेवा कॅनरा बँकेनेही सुरू केली आहे.

पोलीसनामाचे फेसबुक पेज लाईक करा : https://www.facebook.com/policenama/