State Bank Of India | SBI ने ग्राहकांना केलं अलर्ट; पॅन कार्ड आधारशी लिंक न केल्यास बँकिंग सेवेवर होणार परिणाम

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – स्टेट बँक ऑफ इंडियाने (State Bank Of India) त्यांच्या 46 कोटी ग्राहकांना एक महत्त्वाचं आवाहन केलं आहे. एसबीआयने (State Bank Of India) खातेधारकांना त्यांचे पॅन कार्ड आधारशी लिंक (PAN card link aadhar card) करण्यास सांगितले आहे. लवकरात लवकर हे काम पूर्ण करून घेण्यास सांगितले आहे. दरम्यान, हे काम ग्राहकाने निश्चित सीमेपर्यंत पूर्ण नाही केले तर त्यांच्या बँकिंग सेवेवर (bank service) परिणाम होऊ शकतो, असेही एसबीआयने (SBI) म्हटले आहे.

पॅनकार्ड आधारशी लिंक करणे सरकारने अनिवार्य केले आहे. यासाठी 30 सप्टेंबरपर्यंत मुदत देण्यात आली आहे. त्यातच आता एसबीआयने ही ट्विट करत आपल्या ग्राहकांना पॅनकार्ड आधारशी लिंक करण्याचे आवाहन केले आहे. पॅन आधार लिंक न केल्यास पॅन कार्ड निष्क्रिय होईल आणि ट्रान्झॅक्शनसाठी कोट करता येणार नाही. तुम्ही www.incometax.gov.in वर भेट देऊन Link Aadhaar वर क्लिक करुन ही प्रक्रिया पूर्ण करू शकता. याकरता डेडलाइन 30 सप्टेंबर आहे. कोणतीही असुविधा टाळण्यासाठी लवकरात लवकर हे काम पूर्ण करा. हे काम न केल्यास 30 सप्टेंबरनंतर बँकेच्या तुमच्या खात्यावर त्याचा परिणाम होऊ शकतो, असे या ट्विटमध्ये म्हंटले आहे.

 

ऑनलाइन करता येईल लिंक

पॅन कार्ड आधारशी लिंक आहे की नाही हे जाणून घेण्यासाठी इन्कम टॅक्सच्या (income tax)नवीन वेबसाइटचा आधार घेऊ शकता.
इन्कम टॅक्स वेबसाइटवर ओपन करा त्याठिकाणी आधार कार्डावरील नाव, तुमचा पॅन क्रमांक आणि
आधार क्रमांक टाका आधार कार्डवर केवळ जन्माचं वर्ष असेल तर तसा पर्याय निवडा. कॅप्चा टाकून लिंक आधारवर क्लिक करा.
अशाप्रकारे सोप्या पद्धतीने तुमचं आधार पॅन कार्डशी लिंक होईल.

 

SMS द्वारे असे करा लिंक

SMS च्या माध्यमातून पॅन-आधार लिंक करू शकतो.
त्यासाठी तुम्हाला UIDPAN<स्पेस>12 अंकी आधार क्रमांक<स्पेस>10 अंकी पॅन कार्ड क्रमांक टाइप करुन 567678 किंवा 56161 या क्रमांकावर पाठवावा लागेल.

Web Title : State Bank Of India | sbi customer link your pan with aadhaar before 30 september otherwise will stop sbi service

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

India Post Payments Bank | इंडिया पोस्ट पेमेंट बँकेच्या ‘या’ नियमात आजपासून होणार बदल; डोअरस्टेप बँकिंगसाठी मोजवे लागणार 20 रुपये

SBI चा मान्सून धमाका, 31 ऑगस्टपर्यंत मिळेल स्वस्त Home Loan

MPSC ची रिक्त पदे भरण्याचा मार्ग अखेर मोकळा; उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या निर्देशानंतर 2 दिवसात शासनाकडून निर्णय