वेळेत घर नाही मिळाल्यास SBI परत देणार संपुर्ण पैसे, ‘इथं’ पाहा कोण घेऊ शकतं ‘फायदा’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशातील सर्वात मोठी बँक भारतीय स्टेट बँक (SBI) ने जानेवारीपासून रेजिडेंशयल बिल्डर फायनेंस विद बायर गारंटी (RBBG) स्कीम सादर करत आहे. या स्कीम अंतर्गत घर घेणाऱ्यांना निर्धारित वेळेत घराचा ताबा मिळत नाही तर बँक ग्राहकांना प्रिंसिपल अमाऊंट परत करेल. ही रिफंड स्कीम तोपर्यंत मान्य असेल जोपर्यंत बिल्डरला ऑक्यूपेशन सर्टिफिकेट (OC) मिळणार नाही.

जे घर खरेदीदार या योजनेंतर्गत एसबीआयकडून कर्ज घेतात आणि पात्र अटींना पूर्ण करतात ते गारंटीचा लाभ घेऊ शकतात. एका रिपार्टनुसार या स्कीमचा फायदा मात्र काही मर्यादित ग्राहकांनाच मिळेल.

यांना मिळणार नाही या योजनेचा फायदा –
मुंबईचे प्रॉपर्टी कंसल्टेंट साविल्स इंडियाचे सीईओ अनुराग माथूर यांनी सांगितले की, घर खरेदीदार ज्यांनी पहिल्यांदाच एसबीआयकडून गृह कर्ज घेतले आहे आणि त्यांनी प्रकल्पात गुंतवणूक केली आहे जे बँकांसंबंधित नाहीत, या योजनेच्या अंतर्गत कवर (सुरक्षा कवच) दिले जाणार नाही. ही योजना अपार्टमेंट प्रकल्पांसाठी लागू होईल, जेथे एसबीआय एकमात्र कर्जदाता असेल.

काय आहे ही स्कीम –
जर बिल्डर रियल इस्टेट कायद्याअंतर्गत मर्यादित वेळेत काम पूर्ण करण्यात अपयशी ठरतो तर कर्जदाराला रिफंड दिले जाईल. सर्व बिल्डर्सला आपल्या प्रकल्पांना RERA अंतर्गत रजिस्टर करावे लागेल आणि काम कधी पर्यंत पूर्ण होणार याची माहिती द्यावी लागेल. SBI ने RBBG साठी सुरुवात म्हणून सनटेक रिअॅलिटी लिमिटेड (SRL) सह करार केला आहे. हा करार मुंबई महानगर क्षेत्रातील सुरु असलेल्या तीन प्रकल्पांसाठी आहे.

7 शहरात लॉन्च होऊ शकते स्कीम –
एसबीआय लोक फायनान्स स्कीम देशभरात एसबीआयद्वारे फायनान्स सर्व रिअॅलिटी असेस्ट प्रकल्पांवर लागू होणार नाही. एसबीआयनुसार, रेजिडेंशियल बिल्डर फायनान्सबरोबर बायर गारंटी लोन फायनान्स स्कीम होम बायर्सला आपले घर पूर्ण विश्वास आणि पारदर्शकतेसह 7 शहरात एसबीआयद्वारे अप्रुव्ड प्रोजेक्ट निवडण्यास सांगेल.

7.90 टक्के व्याजदराने मिळणार कर्ज –
हे कर्ज सध्याच्या गृह कर्जावर उपलब्ध असेल. बँकने आपल्या व्याजदार कपात केली आहे. 0.25 टक्क्यांनी कपात लागू झाली आहे. नव्या गृह कर्ज ग्राहकांना 8.15 टक्यांच्या तुलनेत 7.90 टक्के दराने कर्ज मिळेल. गृह कर्ज मार्केटमध्ये एसबीआयची 22 टक्के भागीदारी आहे.

फेसबुक पेज लाईक करा –