खुशखबर ! आजपासून ‘SBI’ ग्राहकांना देणार स्वस्तात ‘गृह’ कर्ज, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आजपासून (1 सप्टेंबर) स्टेट बँक ऑफ इंडिया ग्राहकांना गृह कर्ज स्वस्त करणार आहे, SBI च्या रेपो लिंक्ड लेंडिंग रेटने गृह कर्ज प्रणालीची पद्धतच बदलली आहे. SBI ने गृह कर्जात 0.20 टक्के कपात केली आहे. 1 सप्टेंबरपासून गृह कर्ज 8.05 टक्के असेल.

SBI ने 2014 साली मार्जिनल कॉस्ट ऑफ लेंडिग रेट आधारित व्याज दरास सुरुवात केली तर दुसऱ्या बँकांनी देखील बेस रेटची पद्धत बंद करुन MCLR वापरण्यास सुरुवात केली. SBI चा रेपो लिंक्ड लेंडिंग रेट आरबीआयच्या 2.25 टक्के अधिक असतो. सध्या हा रेपो दर 5.40 टक्के आहे. तर SBI चा RLLR 7.65 टक्के आहे. याशिवाय RLLR पेक्षा अधिक 0.40 टक्के आणि 0.55 टक्के स्प्रेड होतो. म्हणजे ग्राहक वर्षाला 8.05 टक्के किंवा 8.20 टक्क्यांवर होम लोन घेऊ शकतो.

सध्या बँक 75 लाख रुपयांपर्यंत MCLR लिंक्ड होम लोन वर 8.35 % पासून 8.90 % व्याज दर घेते. फेब्रुवारीत बँकेने आता पर्यंत MCLR ला 0.30 टक्के कमी केली आहे. तर RBI ने रेपो दरात 1.10 टक्के कपात केली आहे.

आरोग्यविषयक वृत्त –