खुशखबर ! ‘SBI’ गृह कर्जदारांना देऊ शकते मोठे ‘गिफ्ट’, ‘व्याज’ दरात होणार ‘कपात’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशातील सार्वजनिक क्षेत्रातील बँक स्टेट बँक ऑफ इंडिया आपल्या गृह कर्ज ग्राहकांना मोठे गिफ्ट देण्याचा तयारीत आहे. एसबीआय आपल्या ग्राहकांना RBI ने रेपो दरात कपात केल्यानंतर फायदा देण्याच्या विचारात आहे. बँक जुन्या ग्राहकांना देखील रेपो लिंक्ड लेंडिंग रेट वर कर्ज देऊ शकतील. याशिवाय बँकेला विश्वास आहे की, आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या सहामाहीत कंज्यूमर डिमांडचा फायदा होईल.

नव्या, जुन्या ग्राहकांना फायदा –

जुलैमध्ये SBI ने आपल्या नव्या गृह कर्जच्या रेपो लिंक्ड लेंडिंग रेटची घोषणा केली होती. ज्याचा फायदा फक्त नव्या ग्राहकांना देण्यात येणार होता. म्हणजेच जर सरकार रेपो दर कमी करेल तर गृह कर्ज घेतलेल्या ग्राहकांना कमी व्याजदर द्यावा लागेल. SBI चे अध्यक्ष रजनीश कुमार यांनी सांगितले की ते याची शक्यता तपासत आहेत ज्याचा जुन्या ग्राहकांना देखील फायदा मिळेल.

SBI ने 2014 साली मार्जिनल कॉस्ट ऑफ लेंडिग रेट आधारित व्याज दरास सुरुवात केली तर दुसऱ्या बँकांनी देखील बेस रेटची पद्धत बंद करुन MCLR वापरण्यास सुरुवात केली. SBI चा रेपो लिंक्ड लेंडिंग रेट आरबीआयच्या 2.25 टक्के अधिक असतो. सध्या हा रेपो दर 5.40 टक्के आहे. तर SBI चा RLLR 7.65 टक्के आहे. याशिवाय RLLR पेक्षा अधिक 0.40 टक्के आणि 0.55 टक्के स्प्रेड होतो. म्हणजे ग्राहक वर्षाला 8.05 टक्के किंवा 8.20 टक्क्यांवर होम लोन घेऊ शकते.

सध्या बँक 75 लाख रुपयांपर्यंत MCLR लिंक्ड होम लोन वर 8.35 % पासून 8.90 % व्याज दर घेते. फेब्रुवारीत बँकेने आता पर्यंत MCLR ला 0.30 टक्के कमी केली आहे. तर RBI ने रेपो दरात 1.10 टक्के कपात केली आहे.

आरोग्यविषयक वृत्त-

Loading...
You might also like