खुशखबर ! SBI कडून ‘हे’ 3 चार्जेस पूर्णपणे रद्द, ग्राहकांना ‘फायदाच-फायदा’, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशातील सर्वात मोठी बँक असलेल्या एसबीआयने आपल्या ग्राहकांसाठी नवीन बक्षीस दिले आहे. यामध्ये आता एसबीआयच्या वाहन कर्जावरील प्रोसेसिंग फी शून्य करण्यात आली असून यामुळे नवीन कार खरेदी करणाऱ्या ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे. यामुळे आता यापुढे या प्रोसेससाठी लागणारी फी बँकेच्या वतीने घेण्यात येणार नाही.

बँकेच्या या निर्णयाचा मोठ्या प्रमाणात ग्राहकांना फायदा होणार असून सणासुदीच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेतल्याने मोठ्या प्रमाणात वाहन खरेदीमध्ये वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. याचबरोबर बँकेने पर्सनल लोन आणि शैक्षणिक लोन मध्ये देखील मोठे बदल केले आहेत. यापुढे तुम्ही 6 वर्षासाठी पर्सनल लोन घेऊ शकता.

एसबीआय घेणार नाही प्रोसेसिंग फी

बँकेच्या वतीने जारी करण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे कि, सणासुदीच्या दिवसांना लक्षात घेऊन बँकेने हि प्रोसेसिंग फी रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या बँक वाहन कर्जावर 8.70 टक्के व्याज घेत असून जर तुम्ही बँकेच्या ऑनलाईन साईटवरून वाहन कर्जासाठी अर्ज केला आणि प्रोसेस केली तर तुम्हाला आणखी 0.25 टक्क्यांची सूट मिळणार असल्याचे देखील बँकेच्या वतीने सांगण्यात आले आहे. कोणतेही वाहन खरेदी करताना ज्यावेळी तुम्ही बँकेत कर्जासाठी अर्ज करता त्यावेळी बँक तुमच्याकडून प्रोसेसिंग फी घेत असते.

काय असते प्रोसेसिंग फी

ज्यावेळी तुम्ही कोणतेही वाहन खरेदी करण्यासाठी अर्ज करता त्यावेळी बँक हि फी तुमच्याकडून घेत असते. यामुळे आता ग्राहकांना यातून सुटका मिळाल्याने मोठा दिलासा मिळाला आहे.

20 लाख रुपयांपर्यंत घेऊ शकता वैयक्तिक कर्ज

एसबीआयने सणासुदीच्या दिवसांच्या तोंडावर ग्राहकांना मोठा दिलासा दिला असून यापुढे बँक ग्राहकांना 20 लाख रुपयांपर्यंत वैयक्तिक कर्ज देणार आहे. यासाठी तुम्हाला 10.75 टक्के व्याजदर द्यावे लागणार आहे.

शैक्षणिक कर्जावर मोठा निर्णय

जर तुम्हाला विदेशात किंवा उच्च शिक्षणासाठी अर्ज करायचा असेल तर एसबीआय तुम्हाला यामध्ये कर्जरूपी मदत करणार आहे. 50 लाख रुपयांपर्यंत कर्ज तुम्हाला मिळणार आहे. यासाठी तुम्हाला 8.25 टक्के व्याजदर द्यावा लागणार आहे.

1 सप्टेंबर पासून स्वस्त होणार गृह कर्ज

एसबीआयने आपल्या गृहकर्जाच्या व्याजदरांमध्ये देखील मोठी कपात केली असून व्याजदरात 0.20 टक्क्यांची कपात केली असून आता 8.05 टक्क्यांनी गृहकर्ज उपलब्ध होणार आहे.

आरोग्यविषयक वृत्त –