SBI ग्राहकांसाठी खुशखबर ! आता तुमचा EMI लवकरच होणार ‘कमी’, प्रत्येक महिन्याला होणार पैशांची ‘बचत’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – स्टेट बँक ऑफ इंडियाने आपल्या ग्राहकांसाठी एक मोठी घोषणा केली आहे. बँकेने कर्जाचा प्रमुख दर एमसीएलआर-मार्जिनल कॉस्ट ऑफ लँडिंग रेटशी संबंधित मोठा निर्णय घेतला आहे.

बँकेने ट्विट करून सांगितलं की व्याजातील कपातीचा फायदा मिळवण्यासाठी एक वर्ष वाट पाहावी लागणार नाही. स्टेट बँक ऑफ इंडियाने MCLR रिसेट फ्रिक्वेन्सी 1 वर्षाऐवजी आता सहा महिने केली आहे. कर्जदारांना उतरत्या व्याजदाराचा फायदा घेण्यासाठी एक वर्ष वाट पाहावी लागणार नाही. सध्या एसबीआयचा 1 वर्षाचा MCLR 7% तर सहा महिन्यांचा MCLR 6.95% इतका आहे.

एसबीआयने MCLR संबंधी उचललं महत्वाचं पाऊल
एसबीआयने रिसेट फ्रिक्वेन्सी 1 वर्षाऐवजी आता सहा महिने केली आहे. त्यामुळे आता कर्जदारांना उतरत्या व्याजदाराचा फायदा घेण्यासाठी एक वर्ष वाट पाहावी लागणार नाही. हा फायदा आता सहा महिन्याला घेता येणार आहे. बँकेने याबद्दलची माहिती ट्विट करून दिली आहे.

शक्यतो बँका MCLR लिंक्ड लोन एक वर्षाच्या रिसेट फ्रिक्वेन्सी ऑफरवर देतात. याचा अर्थ असा की लोन घेणाऱ्यांना बँकेच्या MCLR कपातीचा फायदा EMI मध्ये कपातीचा फायदा मिळण्यासाठी अधिक वेळ लागतो. त्यामुळं कर्जदारांना रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया द्वारे घोषित केलेल्या पॉलिसी रेटमध्ये कपातीचा फायदा लवकर मिळण्यामध्ये या अनेक अडचणी असतात.

MCLR लिंक्ड लोन कसे स्वस्त असतात
जर होम लोन MCLR बेस्ड व्याजदराशी लिंक्ड असेल तर, इक्वेटेड मंथली इन्सटॉलमेन्टचे पैसे फक्त होम लोनच्या रिसेट तारखेलाच बदलतात. उदाहरणार्थ जर तुमची होम लोनची रिसेट तारीख जानेवारी मध्ये आहे आणि बँकेने त्या वर्षी जुलैमध्ये आपल्या MCLR मध्ये बदल केला तर त्याचा परिणाम तुमच्या इएमआयवर पुढच्या वर्षी जानेवारी महिन्यातच होईल.