State Bank of India (SBI) | आता व्हॉट्सअ‍ॅपवर मिळेल पेन्शन स्लिप आणि बॅलन्स डिटेल, जाणून घ्या कसे

नवी दिल्ली : स्टेट बँक ऑफ इंडिया State Bank of India (SBI) आपल्या ग्राहकांना अनेक सुविधा पुरवते. आता एसबीआयने सिनियर सिटीझन ग्राहकांना व्हॉट्सअ‍ॅपद्वारे पेन्शन स्लिप पाठवण्याची घोषणा केली आहे. एसबीआयने सांगितले की, ही एक नवीन सुविधा आहे जी ग्राहकांसाठी बँकिंग प्रक्रिया सुलभ करण्याचे काम करेल. ग्राहकांना या सुविधेचा लाभ घ्यायचा असेल, तर त्यासाठी ग्राहकांनी बँकेच्या क्रमांकावर फक्त ‘हाय‘ लिहून पाठवायचे आहे. सध्या अनेक बँका आणि कंपन्या आपल्या ग्राहकांच्या सोयीसाठी व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातून माहिती देतात. एसबीआयने (State Bank of India (SBI) देखील अशीच व्हॉट्सअ‍ॅप सेवा सुरू केली आहे. मात्र, जर या सेवेचा लाभ घ्यायचा असेल, तर ग्राहकांना प्रथम एसबीआय इंटरनेट बँकिंग किंवा एसबीआयच्या योनो अ‍ॅपद्वारे रजिस्ट्रेशन करावे लागेल. जाणून घ्या त्याची संपूर्ण प्रोसेस.

अशी सुरू करा एसबीआयची व्हॉट्सअ‍ॅप सेवा
सर्वप्रथम बँकेचा व्हॉट्सअ‍ॅप नंबर +९१९०२२६९०२२६ वर हाय लिहून पाठवा. येथे एकदा रजिस्ट्रेशन पूर्ण झाले की, तुम्हाला बँकेकडून व्हॉट्सअ‍ॅपवर मेसेज मिळू लागतील. यावर अनेक सुविधा मिळतात. येथे विचारलेल्या ऑपशनमध्ये बँक बॅलन्सची चौकशी, मिनी स्टेटमेंट आणि पेन्शन स्लिप यापैकी पर्याय निवडावा लागेल. येथे पेन्शन स्लिप पर्याय निवडल्यानंतर कोणत्या महिन्याची स्लिप हवी ते नमूद करा. ही प्रक्रिया पूर्ण होताच व्हॉट्सअ‍ॅपवर स्लिप मिळेल.

आता मिनी स्टेटमेंट आणि बँक बॅलन्स व्हॉट्सअ‍ॅपवर
आता एसबीआय (State Bank of India (SBI) आपल्या बँक ग्राहकांना व्हॉट्सअ‍ॅपद्वारे बँक बॅलन्स तपासण्याची सुविधा देत आहे. एवढेच नाही तर तुम्ही मिनी स्टेटमेंटची विनंतीही पाठवू शकता. मात्र, व्हॉट्सअ‍ॅपवर बँकिंग सुविधेचा लाभ घ्यायचा असेल, तर ग्राहकांना त्यासाठी रजिस्ट्रेशन करावे लागेल.

इंटरनेट बँकिंगद्वारे अशा प्रकारे करा रजिस्ट्रेशन
१. यासाठी प्रथम एसबीआय ऑनलाइनमध्ये साइन इन करा.
२. यानंतर, विनंती आणि चौकशीच्या पर्यायावर जा.
३. ऑनलाइन नोंदणीचा पर्याय निवडा.
४. त्यानंतर खाते क्रमांक निवडा.
५. त्यावर नॉमिनीची माहिती भरा आणि सबमिट करा.

Web Title :-  State Bank of India (SBI) | sbi now pension slip and balance details will be available on whatsapp know how

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Ajit Pawar | अनिल देशमुख यांच्या सुटकेनंतर अजित पवारांची प्रतिक्रिया, म्हणाले- ‘या प्रकरणचं सत्य…’

Shivsena Shinde Group | मुंबई महापालिकेत राडा, पालिकेतील सेनेच्या कार्यालयावर शिंदे गटाचा दावा; नेत्यांमध्ये जोरदार खडाजंगी (VIDEO)