1 ऑक्टो. पासून SBI बदलणार ‘चेक’ तसेच पैसे जमा करणे व काढण्याचे नियम, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – 1 ऑक्टोबरपासून देशातली सर्वात मोठी बँक असलेली एसबीआय अनेक नियम बदलणार आहे. याबाबत बँकेने एक परिपत्रक जारी केले आहे. नव्या नियमानुसार, एसबीआयने चेकबुकमधील पानांची संख्या घटवली आहे. तसेच चेक बाऊन्स झाल्यावर आकारण्यात येणाऱ्या शुल्कातही वाढ केली आहे. नवीन नियम 1 ऑक्टोबर 2019 पासून पूर्ण देशभरात लागू होणार आहेत.

बँकेने जाहीर केलेल्या सेवा शुल्काच्या नव्या यादीनुसार आता आर्थिक वर्षात 25 ऐवजी केवळ 10 चेक बचत खात्यावर विनामूल्य दिले जातील. यानंतर 10 चेक मोफत मिळणार आहेत. त्यानंतर अधिकच्या 10 चेकची मागणी केल्यास 40 रुपये मोजावे लागणार आहेत. तर पहिल्या मोफत चेकबुकनंतर तुम्हाला 10 चेक घेण्यासाठी 30 रुपये द्यावे लागतील, यामध्ये जीएसटी स्वतंत्रपणे द्यावा लागेल. तुमच्या खात्यात किमान शिल्लक न ठेवल्यास बँक शुल्कही वसूल करणार आहे. याशिवाय NEFT आणि RTGSच्या माध्यमातून व्यवहार करणंही स्वस्त होणार आहे.

1 ऑक्टोबरपासून काय बदलणार आहे ते जाणून घेऊया ….

1) बँक खात्यात पैसे जमा करण्याचे नियम-

एसबीआय सर्वात मोठा बदल बँक खात्यात पैसे जमा करण्याच्या नियमांमधून करेल. बँकेच्या परिपत्रकानुसार 1 ऑक्टोबर 2019 नंतर आपण एका महिन्यात आपल्या खात्यात केवळ तीन वेळा विनामूल्य पैसे जमा करू शकाल. त्याहून अधिक वेळा पैसे जमा केल्यास 50 रुपये जीएसटी व्यतिरिक्त शुल्क आकारलं जाणार आहे. बँक सर्व्हिस चार्जवर 12 टक्के जीएसटी वसूल करणार आहे.त्यामुळे आपण महिन्याभरात चौथ्या किंवा पाचव्यांदा पैसे जमा केल्यास 56 रुपये जास्त द्यावे लागतील. सध्या कोणत्याही बँकेत खात्यात पैसे जमा करण्यावर कोणतीही बंधने नाहीत. एखादी व्यक्ती महिन्यातून किती वेळा त्याच्या खात्यात पैसे जमा करू शकते.

2) मिनिमम बॅलन्सच्या नियमांत बदल –

मिनिमम बॅलन्सला 5 हजारांहून घटवून 3 हजार रुपये करण्यात आला आहे. नव्या नियमांमधील बदलानुसार जर एखादा ग्राहक आपल्या खात्यात किमान 3000 रुपये शिल्लक ठेवण्यास असमर्थ ठरला आणि त्याची रक्कम 1500 पर्यंत असल्यास त्याला 10 रुपये आणि जीएसटी शुल्क आकारले जाईल.
सेमी अर्बन शाखेत एसबीआय ग्राहकांना त्यांच्या खात्यात मासिक किमान 2000 रुपये शिल्लक ठेवावे लागतील आणि ग्रामीण शाखेत सरासरी 1000 रुपये मिनिमम बॅलन्स ठेवणं आवश्यक आहे.

सेमी अर्बन ब्रांचमध्ये जर ग्राहकानं दिलेल्या रकमेच्या फक्त 50 टक्के बॅलन्स ठेवला तर त्याला 7.50 रुपये अधिक जीएसटी द्यावे लागेल. 50 ते 75 टक्क्यांपर्यंत बॅलन्स न ठेवता आल्यास 10 रुपये शुल्कासह जीएसटी द्यावे लागेल. 75 टक्क्यांहून अधिक रक्कम बँकेच्या खात्यात न ठेवल्यास 12 रुपये आणि जीएसटी भरावा लागणार आहे. रुरल ब्रांचमध्ये सरासरी 1000 रुपये बॅलन्स ठेवाव लागणार आहे. त्यापेक्षा कमी रक्कम खात्यात ठेवल्यास 5 रुपये आणि जीएसटी भरावा लागणार आहे. 50 टक्क्यांहून अधिक रकमेवर आणि 75 टक्क्यांपर्यंतच्या रकमेवर 7.50 रुपये अधिक जीएसटी द्यावा लागणार आहे. 75 टक्क्यांपेक्षा ज्यादा रकमेवर 10 रुपये तसेच जीएसटी भरावा लागणार आहे.

3) NEFT आणि RTGS नियम बदलला-

नॅशनल इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्सफर (NEFT)आणि रियल टाइम ग्रॉस सेटलमेंट (RTGS) साठीच्या शुल्कातही बदल करण्यात आला आहे. हे डिजिटल पेमेंटच्या माध्यमातून मोफत आणि शाखेत त्याची फी आकारली जाते. याचं शुल्क बँकेकडून वसूल केलं जातं. 10 हजार रुपयांपर्यंत एनईएफटीच्या व्यवहारावर 2 रुपये आणि जीएसटी आकारला जाणार आहे. 2 लाखांहून अधिकची राशी एनईएफटी केल्यास 20 रुपये अधिक जीएसटी द्यावा लागणार आहे. 5 लाखांहून अधिकचा व्यवहार करण्यासाठी 40 रुपये अधिक जीएसटी शुल्क आकारलं जातं.

नव्या बदलांनुसार, जर कोणत्या ग्राहकानं महिन्यातून तीनदा पैसे जमा करणं आणि काढल्यास व्यवहार मोफत होणार आहे. त्यानंतर प्रत्येक व्यवहारासाठी 50 रुपये अधिक जीएसटी लागणार आहे. नवीन बदलानुसार जर एखादा ग्राहक एका महिन्यात तीनदा पैसे जमा करुन काढत असेल तर हा व्यवहार विनामूल्य असेल. त्यानंतरच्या प्रत्येक व्यवहारासाठी ते 50 रुपये अधिक जीएसटी असेल. नॉन-होम शाखेत रोख रक्कम जमा करण्याची कमाल मर्यादा दिवसाला 2 लाख रुपये आहे. यापेक्षा अधिक रोख रक्कम स्वीकारायची की नाही याबाबत ब्रँच मॅनेजर निर्णय घेईल.

4) एसबीआय एटीएम नियम –

एसबीआयच्या एटीएम शुल्कामध्येही 1 ऑक्टोबरपासून बदल होणार आहे. आता बँकेचे ग्राहक मेट्रो शहरांच्या एसबीआय एटीएममधून जास्तीत जास्त 10 विनामूल्य डेबिट व्यवहार करू शकतील. सध्या ही मर्यादा 6 व्यवहारांची आहे. त्याचबरोबर इतरत्र एटीएममधून जास्तीत जास्त 12 ट्रांजेक्शन करता येतात.

5) चेकबुकचे नियम –

1 ऑक्टोबरपासून बचत बँकेच्या खातेदारास पहिले 10 चेक विनामूल्य उपलब्ध होतील. यानंतर 10 चेकबुकवर 40 रुपये + जीएसटी आणि 25 धनादेशांच्या चेकबुकसाठी 75 रुपये + जीएसटी आकारला जाईल. एसबीआयने चेक रिटर्न्सचे नियमही कडक केले आहेत. बँकेच्या परिपत्रकानुसार, तांत्रिक कारणास्तव (बाऊन्स व्यतिरिक्त) 1 ऑक्टोबरनंतर चेक परत केला तर चेक जारी करणार्‍यास दीडशे रुपये आणि अतिरिक्त जीएसटी भरावा लागेल. जीएसटीसह हा शुल्क 168 रुपये असेल.

Visit : policenama.com