‘SBI’ नं 42 कोटी ग्राहकांना केलं ‘सावध’ ! मोबाइलवर येणारा ‘हा’ मेसेज रिकामं करु शकतो तुमचं ‘बँक’ खातं, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशातील सर्वात मोठी सार्वजनिक बँक State Bank of India ने आपल्या ग्राहकांना इनकम टॅक्स रिटर्नच्या नावे होणाऱ्या फसवणूकीसंबंधित सावध केले आहे. या फसवणूकीपासून वाचण्यासाठी सावधगिरीचा इशारा दिला आहे. बँकेने ग्राहकांना सांगितले आहे की अशा कोणत्याही मेसेजच्या लिंकवर क्लिक करुन नका ज्यात टॅक्स रिफंडची रिक्वेस्ट करण्याची माहिती दिली आहे. सध्या अनेकांना असे मेसेज येत आहे. ज्यात असे आहे की या लिंकवर क्लिक करा आणि तुम्ही तुमच्या इनकम टॅक्स रिफंडची माहिती मिळवू शकतात.

SBI ने दिली ट्विट करत माहिती
बँकेने आपल्या ट्विटमध्ये लिहिले की तुम्हाला इनकम टॅक्स डिपार्टमेंटच्या नावे फॉर्मल रिक्वेस्ट करण्याचा एक मेसेज येत आहे? हा मेसेज तुमची फसवणूक करणारा आहे. तुम्ही या मेसेजकडे दुर्लक्ष करा आणि संबंधित मेसेजचा रिपोर्ट करा.

SBI ने एक अनिमेडेट व्हिडिओ जारी केला आहे, ज्यात एका ग्राहकांला इनकम टॅक्स रिफंडचा मेसेज येतो. या व्हिडिओतून माहिती देण्यात आली की या मेसेजमधील लिंकवर क्लिक केल्यानंतर तुमची फसवणूक होईल. यामाध्यमातून तुमच्या बँकेची माहिती चोरण्यात येते. ज्या गैरउपयोग केला जातो.

या पद्धतीने करतात फसवणूक
अशा प्रकारच्या घोटाळ्यांना, फसवेगिरीला फिशिंग म्हणले जाते, फिशिंग तंत्रज्ञानाचा वापर करुन फसवणूकीचे प्रकार घडतात. ज्यात एक फेक वेबसाइट तयार केली जाते जी एखाद्या आधिकृत वेबसाइटसारखी दिसते. यामाध्यमातून ग्राहकांच्या बँकांची माहिती चोरली जाते. याच कारणाने एसबीआयने ग्राहकांना सावध केले आहे की अशा मेसेजच्या लिंकवर क्लिक करु नका, अन्यथा तुमच्या बँक खात्याची माहिती चोरली जाईल.

इनकम टॅक्स पोर्टलवरुन मिळेल टॅक्स रिफंडची माहिती
इनकम टॅक्स डिपार्टमेंटने देखील एक चेतावनी दिली आहे. ज्यात करदात्यांना सांगण्यात आले आहे की या प्रकारचा फसवणूकीच्या जाळ्यात अडकू नका. इनकम टॅक्स डिपार्टमेंट रिफंड जारी करतो तेव्हा तो थेट करदात्यांच्या बँक खात्यात जमा होतो. कोणताही करदाता टॅक्स ई – फायलिंग पोर्टलवर लॉगइन करुन आपल्या टॅक्स रिफंडची माहिती मिळवू शकतात.

Visit : policenama.com