मोठी बातमी ! SBIनं कर्जाबाबतची ‘ही’ स्कीम मागे घेतली, ग्राहकांवर थेट परिणाम होणार, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशातील सर्वात मोठी बँक स्टेट बँक ऑफ इंडियाने (SBI) रेपो लिंक्ड लेन्डिंग रेट (RLLR) होम लोन योजना मागे घेतली आहे. एसबीआयने जुलैमध्ये रेपो रेट लिंक्ड होम लोन योजना सुरू केली होती. ट्विटरवर वापरकर्त्याच्या प्रश्नाला उत्तर देताना बँकेने ट्विट केले आहे की त्यांनी रेपो दर आधारित गृह कर्ज योजना मागे घेतली आहे. आता बँक MCLR दरानुसारच बँक कर्ज देईल.

रिझर्व्ह बॅंकेने सर्व बँकांना नवीन फ्लोटिंग रेट होम लोन, ऑटो लोन १ ऑक्टोबरपासून एक्‍सटर्नल बेंचमार्क शी जोडण्यास सांगितले होते. या पार्श्वभूमीवर एसबीआयने रेपो रेट लिंक्ड होम लोन योजना मागे घेतली आहे. एका वृत्तसंस्थेच्या अहवालानुसार एका आठवड्यापूर्वी बँकेने आपल्या वेबसाइटवरून रेपो रेट लिंक्ड कर्ज योजना काढून टाकली. आता बँक परत पूर्वीच्याच मार्जिनल कॉस्ट ऑफ लेन्डिंग रेट दरावर (MCLR) कर्ज देत आहे.

SBI रेपो लिंक्ड होम लोन देणारी पहिली बँक :
दरम्यान, एसबीआयने देशात सर्वप्रथम प्रथम रेपो दर आधारित गृह कर्जाची योजना आणली होती. यानंतर इतर बँकांनी अशी कर्जे आणली आहेत. ‘रेपो रेट लिंक्ड लेन्डिंग रेट बेस्ड होम लोन स्कीम’ ही एक नवीन योजना ज्यामध्ये RBI ने रेपो दर कमी केल्यास गृहकर्ज ग्राहकांना देखील कमी व्याज द्यावे लागेल. रेपो दर कमी करण्याचा फायदा लवकरात लवकर ग्राहकांपर्यंत पोहोचविणे हा यामागील हेतू होता.

सध्या केवळ नवीन ग्राहकांना लाभ मिळत आहे :
या वर्षाच्या जुलैमध्ये एसबीआयने आपल्या नवीन गृह कर्जासाठी रेपो लिंक्ड लेन्डिंग रेट (RLLR) योजना जाहीर केल्यानंतर त्याचा फायदा फक्त नवीन ग्राहकांना देण्यात येणार होता. याचा अर्थ असा की सरकारने रेपो दर कमी केल्यास गृहकर्ज ग्राहकांनाही कमी व्याज द्यावे लागेल. तथापि, एसबीआयचे अध्यक्ष रजनीश कुमार म्हणाले की, जुन्या ग्राहकांना हा लाभ कसा मिळू शकेल या शक्यतेबाबत ते सध्या शोध घेत आहेत.

हे गणित आहे :
२०१४ मध्ये एसबीआयने जेव्हा मार्जिनल कॉस्ट ऑफ लेन्डिंग रेट (MCLR) आधारित व्याज दर लागू केला तेव्हा इतर बँकांनीही बेस रेट प्रणाली सोडून एमसीएलआर स्वीकारला. एसबीआयचा रेपो-लिंक्ड कर्ज दर (RLLR) आरबीआयच्या रेपो दरापेक्षा २.२५ टक्के अधिक आहे. सध्या रेपो दर ५.४० टक्के आहे, तर एसबीआयचा आरएलएलआर ७.६५ टक्के आहे. या व्यतिरिक्त, आरएलएलआरच्याच्या बाबतीत हे प्रमाण ०. ४० टक्के आणि ०.५५ टक्के अधिक आहे. त्यानुसार नवीन गृहकर्ज ग्राहक वार्षिक कर्ज ८.०५ टक्के किंवा ८.२० टक्के दराने गृह कर्ज घेऊ शकतात.

Visit – policenama.com