SBI नं आज सुरू केला घरांचा लिलाव, खरेदी करता येणार स्वस्त घर, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशातील सर्वात मोठी सरकारी बँक एसबीआयने (SBI) आजपासून देशभरात मालमत्ता लिलावाची प्रक्रिया सुरू केली आहे. जर आपण देखील स्वस्त घर खरेदी करण्याचा विचार करीत असाल तर आपल्यासाठी ही चांगली संधी आहे. मालमत्तांचा ई-लिलाव सुरू झाली आहे. या ई-लिलावात निवासी आणि व्यावसायिक दोन्ही मालमत्तांचा समावेश आहे. एसबीआयद्वारे वेळोवेळी अशा मालमत्तेचा लिलाव केला जातो. ट्वीटद्वारे बँकेने मालमत्ता लिलावाची माहिती दिली आहे.

डीफॉल्ट मालमत्तेचा केला जातो लिलाव
ज्या मालमत्ता मालकाने त्याचे कर्ज भरलेले नाही. किंवा काही कारणास्तव तेे कर्ज फेडू शकले नाही, त्या सर्व लोकांची संपत्ती बॅंकांनी ताब्यात घेेतली आहे. एसबीआय वेळोवेळी अशा मालमत्तांचा लिलाव करत असते. या लिलावात बँक मालमत्ता विकून त्याची थकबाकी गोळा करते.

SBI ने केले ट्विट
स्टेट बँक ऑफ इंडियाने ट्विटद्वारे याबाबत माहिती दिली आहे. बँकेने ट्विटमध्ये लिहिले की, आपण गुंतवणूकीसाठी मालमत्ता शोधत आहात? तसे असल्यास आपण एसबीआय ई-लिलावात नोंदणी करू शकता. अधिक माहितीसाठी https://bit.ly/2HeLyn0 या दुव्यावर क्लिक करा.

लिलावाच्या वेळी या गोष्टी ठेवा लक्षात
– एसबीआय मालमत्तांचा लिलाव करीत आहे ज्यांना त्यांचे कर्ज परतफेड करता आले नाही.
– यासाठी बँकेने सोशल मीडिया, फेसबुक, ट्विटरच्या माध्यमातून वेगवेगळ्या वर्तमानपत्रात माहिती दिली आहे.
– ही बोली बाजारभावापेक्षा कमी असेल.
– मेगा ई-लिलावादरम्यान तुम्हाला निवासी, व्यावसायिक आणि औद्योगिक मालमत्तांसाठी बोली लावण्याची संधी मिळेल.
– निविदाकारांना त्यांच्या अधिकृत वेबसाइटवर नोंदणी करावी लागेल.
– यासाठी मोबाइल नंबर व ईमेल आयडीद्वारे ही नोंदणी केली जाईल.
– निविदाकारांना केवायसीसाठी कागदपत्रे अपलोड करावी लागतील.
– पडताळणी पूर्ण झाल्यानंतर ऑनलाईन चालान भरले जाईल, त्यानंतरच आपण ऑनलाईन बोली लावण्यास सक्षम असाल.
– केवायसीच्या संपूर्ण तपशिलासाठी सर्व कागदपत्रे बँक शाखेत सादर करावी लागतील.

एसबीआय लिलावाबद्दल अधिक माहितीसाठी आपण या लिंकला भेट देऊ शकता-
bankeauctions.com/Sbi;
sbi.auctiontiger.net/EPROC/;
ibapi.in;
mstcecommerce.com/auctionhome/ibapi/index.jsp

येत्या काही दिवसांत होणार लिलाव –
पुढील 7 दिवसांत – 758 (निवासी) 251 (वाणिज्यिक) 98 (औद्योगिक)
पुढील 30 दिवसांत – 3032 (निवासी) 844 (व्यावसायिक) 410 (औद्योगिक)