SBI आजपासून स्वस्तात विकत आहे घर, गाडी आणि जमीन, जाणून घ्या कसे खरेदी करू शकता ?

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – एसबीआय (State Bank Of india) चा मेगा ई-लिलाव आजपासून म्हणजे 5 मार्चपासून सुरू होत आहे. यावेळच्या लिलावात तुम्ही रेसिडेंशियल, कमर्शियल प्रॉपर्टी आणि लँडशिवाय प्लँट, मशीनरी आणि वाहनासाठी सुद्धा बोली लावू शकता. लिलावात स्वस्त्यात प्रॉपर्टी मिळू शकते. ही ती प्रॉपर्टी आहे जी डिफॉल्टच्या लिस्टमध्ये आली आहे. एसबीआयने यासंदर्भात ट्विट केले आहे.

ही प्रॉपर्टी देशातील विविध शहरांमध्ये आहे, यासाठी तुम्ही लोकेशनच्या हिशेबाने बोली लावू शकता. या वेबसाइटवर प्रॉपर्टीसाठी रिझर्व्ह प्राईससुद्धा टाकण्यात आली आहे. लिलावाची प्रक्रिया 5 मार्चपासून सुरु झाली आहे.

या नंबरवरून सुद्धा करू शकता संपर्क
एसबीआयकडून हेल्पलाइन नंबर- (033 – 40602403 / 40067351 / 40628253 / 40645316 / 40645207 / 40609118 सुद्धा जारी करण्यात आले आहेत. जर कोणत्याही प्रकारची माहिती हवी असेल तर येथे संपर्क साधू शकता.

बँकेनुसार, ते संपत्तीच्या होल्ड किंवा लीजहोल्ड होणे, ठिकाण, माप इत्यादीसह अन्य माहिती सुद्धा लिलावासाठी जारी सार्वजनिक नोटीसमध्ये देते. जर ई-लिलावाद्वारे प्रॉपर्टी खरेदी करायची असेल तर बँकेत जाऊन प्रक्रिया आणि संबंधित प्रॉपर्टीबाबत कोणत्याही प्रकारची माहिती घेऊ शकता.

डिफॉल्ट प्रापर्टीचा होतो लिलाव
ज्या प्रॉपर्टीच्या मालकांनी आपले लोन चुकते केलेले नाही, किंवा एखाद्या कारणामुळे कर्ज फेडू शकलेले नाहीत त्या सर्व लोकांची जमीन बँकेद्वारे ताब्यात घेतली जाते. एसबीआय वेळोवेळी अशाप्रकारच्या प्रॉपर्टीचा लिलाव करत असते. या लिलावात बँक प्रॉपर्टी विकून आपली दिलेली रक्कम वसूल करते.

ऑक्शनबाबत अधिक माहितीसाठी या लिंकवर क्लिक करा

सी1 इंडिया प्रायव्हेट लिमिटेड : https://www.bankeauctions.com/Sbi
ई-प्रोक्युरमेंट टेक्नॉलॉजीज लिमिटेड : https://sbi.auctiontiger.net/EPROC/
प्रॉपर्टीज पाहण्यासाठी : https://ibapi.in
लिलाव प्लॅटफॉर्म : https://www.mstcecommerce.com/auctionhome/ibapi/index.jsp