आता दिल्लीच्या शाळा-मदरशांमध्ये हनुमान चालीसेचा ‘पाठ’ आवश्यक : भाजप महासचिव कैलाश विजयवर्गीय

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – दिल्लीमध्ये आम आदमी पक्षाने प्रचंड बहुमतांनी विजय मिळवला आहे. या विजयावर भाजपाचे सरचिटणीस कैलास विजयवर्गीय यांनी केजरीवालांना शुभेच्छा दिल्या. तसेच त्यांनी सल्ला दिला की दिल्लीच्या शाळा आणि मदरशांमध्ये हनुमान चालीसेचे धडे सुरू करावे.

कैलाश विजयवर्गीय यांनी ट्विट केले की, ‘अरविंद केजरीवाल यांना जिंकल्याबद्दल अभिनंदन. जो हनुमानजींच्या आश्रयाला येतो त्याला आशीर्वाद मिळतोच. आता वेळ आली आहे की हनुमान चालीसेचा पाठ दिल्लीतील सर्व शाळा, मदरसे व इतर शैक्षणिक संस्थांमध्ये होणे आवश्यक आहे. पुढे त्यांनी लिहिले की, ‘बजरंगबलीच्या कृपेने दिल्लीतील मुलांना आता वंचित का ठेवले पाहिजे?’

दिल्लीत निवडणुका जरी संपल्या असल्या तरी ‘हनुमान जी’ वरील राजकीय कुरघोडी अजून शांत झाली नाही. हनुमान चालीसेपासून सुरू झालेला हा वाद अजूनही शांत झालेला नाही. भाजपाच्या पराभवानंतर बुधवारी सकाळी भाजपाचे सरचिटणीस कैलास विजयवर्गीय यांनी पुन्हा एकदा अरविंद केजरीवाल यांना विजयाबद्दल अभिनंदन करत पुन्हा एकदा ‘हनुमानजीं’ना मध्ये घेऊन आले.

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी देखील एके दिवशी म्हटले होते की केजरीवालांनी हनुमान चालीसा वाचण्यास सुरुवात केली आहे, आता बघाच पुढे पुढे काय होते. येणाऱ्या काळात ओवैसी देखील हनुमान चालीसा वाचताना दिसेल.

या निवडणुकीच्या दरम्यान एका वृत्तवाहिनीवर केजरीवालांनी हनुमान चालीसा गाऊन दाखविली होती. त्यानंतर भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी त्यांच्यावर चारी बाजूंनी हल्ला केला आहे. कपिल मिश्रा यांनी देखील केजरीवाल यांच्यावर निशाणा साधला होता. त्यांनी ट्विट केले होते की केजरीवाल हनुमान चालीसा वाचू लागले आहेत, आता तर ओवैसी देखील हनुमान चालीसा वाचतील. ही आपल्या ऐक्याची ताकद आहे. असेच एकत्र राहणे गरजेचे आहे आणि एकत्र राहून मतदान करावे. कपिल मिश्रा यांनी पुढे लिहिले की आपल्या सर्वांच्या ऐक्यातून २० टक्क्यांचे वोट बँकेचे घाणेरडे राजकारण बंद होईल.