State Board CET 2021 | अकरावीसाठीची CET परीक्षा रद्द, 10 वीच्या गुणांवर प्रवेश; हाय कोर्टाचे निर्देश

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – State Board CET 2021 | राज्य शासनाच्या शालेय शिक्षण विभागाने राज्य मंडळामार्फत (State Board) घेण्यात येणारी 10 वी बोर्ड परीक्षा रद्द केली. त्यांनतर 10 वीच्या अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे निकाल जाहीर करण्यात आला. त्यानंतर 11 वीला प्रवेश घेण्यासाठी (State Board CET 2021) सामान्य प्रवेश परीक्षा जाहीर करण्यात आली होती. मात्र 11 वी प्रवेशासाठीची सामान्य प्रवेश परीक्षा मुंबई हाय कोर्टाकडून रद्द करण्यात आली आहे. आता, 11 वीप्रवेशासाठी 10 वीच्या गुणांच्या आधारेच प्रवेश घेण्यात यावेत याबाबत आदेश उच्च न्यायालयाने (Mumbai High Court) दिले आहेत.

अकरावी प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना 10 वीच्या अभ्यासक्रमावर आधारीत सीईटी परीक्षा घेण्यात येणार होती. तसेच, अनेकांनी या सामान्य प्रवेश परीक्षा (CET) साठी प्रवेश अर्ज देखील विद्यार्थ्यांनी दाखल केले होते. परंतु, आता सामान्य प्रवेश परीक्षा (CET) रद्द करण्याचा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाने घेतला आहे. दरम्यान, अकरावीचे प्रवेश 10 वीच्या गुणांवरच करा असे आदेश देखील हाय कोर्टाकडून (High Court) देण्यात आले आहेत.

Web Title :- State Board CET 2021 | cet cancelled for 11th based on ssc evaluation by mumbai high court

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Shriguru Balaji Tambe | आयुर्वेदाचार्य श्रीगुरु डॉ. बालाजी तांबे यांचे 81 वर्षी निधन

Benefits of Sleeping Naked | पुरूषांनी कपडे न घालता झोपलं पाहिजे, होतील ‘हे’ खास फायदे; महिलांसाठी देखील चांगलं

Google वर 5000% जास्त सर्च केला गेला ‘हा’ शब्द ! नेमकं काय आहे ते जे संपुर्ण जगाला जाणून घ्यायचंय?