State Boards Corporations | बोर्ड, महामंडळाच्या नियुक्त्यांसाठी महाविकास आघाडीच्या हालचाली सुरू; लवकरच मुख्यमंत्र्यांकडे यादी जाणार

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारमध्ये काही दिवसांपासून कटुता निर्माण झाल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यावर उपाय म्हणून तिन्ही पक्षांनी ५० पेक्षा जास्त बोर्ड आणि महामंडळाच्या (State Boards Corporations) नियुक्त्यांसाठी हालचाली सुरू केल्या आहेत. बैठकांचे सत्र सुरू झाले असून रविवारी तीनही पक्षातील मंत्री असलेल्या सहा सदस्यीय समन्वय समितीने बोर्डावरील आणि महामंडळावरील (State Boards Corporations) संचालक तसेच अध्यक्ष यांच्या नावाला अंतिम स्वरूप देण्यासाठी बठक घेतली आहे. दरम्यान या निवडींमुळे आघाडी अधिक मजबूत होईल असे सूत्रांनी सांगितले.

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

समन्वय समितीत ज्येष्ठ मंत्री सुभाष देसाई subhash desai, एकनाथ शिंदे eknath shinde (शिवसेना),
अजित पवार ajit pawar, जयंत पाटील (राष्ट्रवादी) jayant patil, अशोक चव्हाण ashok chavan,
बाळासाहेब थोरात (काँग्रेस) balasaheb thorat यांचा समावेश आहे.
आतापर्यंत या समितीने निवडीसाठी २५ वेळा बैठका घेतल्या आहेत.
मात्र रविवारी झालेल्या बैठकीत काही नावांवर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे.
त्यामुळे कोणत्याही क्षणी ही समिती नावाची यादी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे chief minister uddhav thackeray यांच्याकडे सोपवू शकते.
यामुळे निर्माण झालेली राजकीय अस्थिरता कमी होऊ शकेल.

Post Office | पोस्टाची जबरदस्त योजना ! 50 हजार जमा करा अन् पेन्शन स्वरुपात जबरदस्त रिटर्न्स मिळवा, जाणून घ्या

या संदर्भात बोलताना सुभाष देसाई म्हणाले, नियुक्त्यांबाबत विचारविनिमय पूर्ण झाला आहे. एक यादी तयार करण्यात आली असून त्याला अंतिम स्वरूप देण्यात येत आहे. ही यादी तयार करताना विशेष काळजी घेण्यात आली आहे म्हणजे एखादे चुकीचे पाऊल राजकीय भवितव्यावर परिणाम करू शकेल याची जाणीव ठेवून ही यादी करण्यात आली आहे. लवकरच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे chief minister uddhav thackeray यांच्यासमोर ही यादी सादर केली जाणार आहे. दुसरीकडे भाजपने वारंवार आघाडी तोडण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र अजून तरी त्यात भाजपला यश मिळाले नाही. बोर्ड आणि महामंडळाच्या नियुक्त्यांमुळे ज्या नेत्यांना खासदार, आमदार म्हणून संधी मिळाली नाही त्यांना या माध्यमातून लोकांमध्ये काम करण्याची संधी मिळणार आहे . महत्त्वाचे म्हणजे आघाडी मजबूत होऊ शकते.

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

Web Titel : State Boards Corporations Appointments state boards corporations movements in progress

हे देखील वाचा

तुमच्या Aadhaar Card वर जेंडर चुकीचे आहे का? UIDAI ने जारी केली लिंक; आता घरबसल्या अपडेट करा ‘या’ सोप्या पध्दतीनं, जाणून घ्या

रश्मी शुक्ला यांच्यासह एका पोलिस अधीक्षकांवर गंभीर आरोप; पोलिसांत तक्रार, कारवाईची मागणी