State Cabinet Expansion | राज्याचा मंत्रीमंडळ विस्तार लवकरचं..; दक्षिण महाराष्ट्रात मिळू शकतात ३ मंत्रीपदे

State Government | maharashtra govt have to pay 300 crore instead of 5 crore due to mistake of govt officers
File Photo
ADV

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाईन | राज्याचा बहुचर्चित मंत्रीमंडळ विस्तार (State Cabinet Expansion) लवकरच होणार असल्याचे खात्रीलायक वृत्त हाती आले आहे. फेब्रुवारी अथवा मार्च महिन्यात मंत्रीमंडळ विस्तार होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. यात दक्षिण महाराष्ट्रातील ८ आमदारांची नावे चर्चेत असल्याचे देखील वृत्त आहे. आणि या आठपैकी तीघा जणांचा समावेश मंत्रीमंडळात करण्यात येणार आहे. असे खात्रीलायक सुत्रांकडून सांगण्यात येते. यामध्ये कोल्हापूर जिल्ह्याच्या वाट्याला दोन तर सांगली आणि सातारा या जिल्ह्यास एक मंत्रीपद मिळणार आहे. यातील इच्छुकांना मंत्रीमंडळ न मिळाल्यास नाराजी रोखण्यासाठी त्यांना महामंडळात समावेश करण्यात येणार असल्याची देखील चर्चा आहे. (State Cabinet Expansion)

सध्या महाराष्ट्रातील मंत्रीमंडळात दक्षिण महाराष्ट्रातून सांगली जिल्ह्यातील सुरेश खाडे (Suresh Khade) आणि सातारा जिल्ह्यातून शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) हे दोघेच मंत्रीमंडळात आहेत. यात कोल्हापूर जिल्ह्यातून एकही मंत्री नाहीये. चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) हे जरी मुळ कोल्हापूरचे असले तरी ते कोथरूड विधानसभा मतदारसंघातून (Kothrud Assembly Constituency) निवडूण आल्यामुळे त्यांचा समावेश पुण्याच्या कोट्यात होतो. कोल्हापूर जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाची धूरा ही सध्या कोकणचे असलेले दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांच्या खांद्यावर देण्यात आली आहे. त्यामुळे आता येत्या मंत्रीमंडळ विस्तारात कोल्हापूर जिल्ह्यात मंत्रीमंडळ देण्यात येणार असून त्यावेळी कोल्हापूर जिल्ह्याचा पालकमंत्री देखील बदलण्यात येणार आहे. असे देखील बोलले जात आहे.

येत्या महिनाभरात राज्याचा मंत्रीमंडळ विस्तार (State Cabinet Expansion) होणार आहे.
दक्षिण महाराष्ट्रातील आठ इच्छुकांमध्ये, राजेंद्र पाटील यड्रावकर (Rajendra Patil Yadravkar),
प्रकाश आबिटकर (Prakash Abitkar), विनय कोरे (Vinay Kore), प्रकाश आवाडे(Prakash Awade),
शिवेंद्रराजे भोसले (Shivendraraj Bhosale), अनिल बाबर (Anil Babar), सुधीर गाडगीळ
(Sudhir Gadgil), गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांचा समावेश आहे.
या नावांतील आमदार विनायक कोरे आणि आमदार अनिल बाबर यांचा मंत्रीमंडळातील समावेश निश्चित मानला
जात आहे. तर उर्वरित आमदारांपैकी कुणाला मंत्रीपद मिळणार याची उत्सुकता लागली आहे.

दरम्यान, शिंदे गटातून मंत्रीपदासाठी दावेदार जास्त आणि शिंदे गटासाठी मंत्रीमंडळाचा कोटा कमी अशी अवस्था आहे. त्यामुळे शिंदे गटात मंत्रीमंडळ विस्तारानंतर नाराजीचा सुर येण्याची शक्यता आहे.
हीच नाराजी दूर करण्यासाठी त्यांना कॅबिनेट दर्जाचे एखाद्या महामंडळाचे अध्यक्षपद दिले जाऊ शकते.
असे देखील बोलले जात आहे.

Web Title :- State Cabinet Expansion | state cabinet will be expanded soon 8 leaders from south maharashtra in the contest for the ministerial post

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime News | पुण्यातील अट्टल गुन्हेगार नाशिक कारागृहात स्थानबद्ध, MPDA कायद्यान्वये CP रितेश कुमार यांची तिसरी कारवाई

Shubman Gill | शुभमन गिलने शतकी खेळी करत ‘हे’ विक्रम केले आपल्या नावावर; दिग्गजांनाही टाकले मागे

Total
0
Shares
Related Posts