राज्याचे मुख्य सचिव अजोय मेहतांना पुन्हा ‘मुदतवाढ’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्याचे मुख्य सचिव अजोय मेहता यांना तीन महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली आहे. अजोय मेहता हे 20 मार्च रोजी सेवानिवृत्त होणार होते. मात्र, करोनाच्या पार्श्वभूमीवर विशेष बाब म्हणून राज्याचे मुख्य सचिव अजोय मेहता यांना तीन महिने मुदतवाढ देण्यात आली आहे.
राज्याचे मुख्य सचिव अजोय मेहता हे 30 सप्टेंबर रोजी सेवानिवृत्त होणार होते. मात्र, त्यावेळी त्यांना 6 महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली होती. अजोय मेहता हे 20 मार्च रोजी सेवानिवृत्त होणार होते. मात्र आता त्यांना तीन महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली असून त्यांचा कार्यकाळ 30 जून 2020 पर्यंत वाढवण्यात आला आहे.

अजोय मेहता हे 1984 च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. 10 मे 2019 रोजी त्यांची राज्याच्या मुख्य सचिवपदी नियुक्ती करण्यात आली होती. तत्कालीन मुख्य सचिव यूपीएस मदान यांनी स्वेच्छा निवृत्ती घेतल्यावर तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मेहता यांना त्या जागी आणले होते. मेहता यांच्या जागी मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव प्रवीण परदेशी यांना महापालिकेत पाठवण्यात आले.

You might also like