दिल्लीच्या सरकारी शाळेत येणार मेलानिया ट्रम्प, मात्र उपस्थित नसणार CM केजरीवाल

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आपल्या दोन दिवसीय भारत दौऱ्यादरम्यान अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पत्नी मेलानिया ट्रम्प 25 फेब्रुवारीला दिल्लीतील सरकारी शाळेत हॅप्पीनेस क्लासमध्ये सहभागी होतील. यावेळी शिक्षण विभागाचे अधिकारी देखील तेथे उपस्थित असतील.

तर सूत्रांनुसार दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि शिक्षण मंत्री मनीष सिसोदिया या दरम्यान उपस्थित नसतील. जेव्हा मेलानिया शाळेत हॅप्पीनेस क्लासची पाहणी करतील. सूत्रांच्या मते या दरम्यान त्या इतर कार्यक्रमात देखील सहभागी होतील.

केंद्र सरकारच्या यादीत मुख्यमंत्री – उपमुख्यमंत्र्यांचे नाव नाही –
केंद्र सरकारद्वारे तयार करण्यात आलेल्या यादीत मुख्यमंत्री केजरीवाल आणि उपमुख्यमंत्री सिसोदिया याचे नाव नाही. परंतु याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आली नाही.

सुरक्षेच्या कारणास्तव शाळेचे नाव जाहीर करण्यात आले नाही –
गुप्तचर संस्थांनी सांगितले की, सुरक्षेच्या कारणाने दिल्लीतील त्या सरकारी शाळेचे नाव सार्वजनिक करण्यात आलेले नाही जेथे हॅप्पीनेस क्लास मध्ये मेलानिया ट्रम्प मंगळवारी सहभागी होतील. यावर बोलताना कॅबिनेट मंत्री गोपाल राय म्हणाले की या कार्यक्रमातून केजरीवाल आणि सिसोदिया यांना दूर ठेवण्यात आल्याबद्दलची माहिती माझ्याकडे नाही.

काय आहे हॅप्पीनेस क्लास –
दिल्लीतील सरकारी शाळेत सुरु असलेल्या हॅप्पीनेस क्लासचे (खुशी के पाठ्यक्रम असे या पाठ्यक्रमाचे नाव आहे) अनेक तज्ज्ञांनी कौतूक केले आहे. हाच उपक्रम अमेरिकाचे अध्यक्ष ट्रम्प यांच्या पत्नी मेलानिया जाऊन पाहतील. दिल्ली सराकारने या पाठ्यक्रमाची सुरुवात 2018 साली केली होती.

हॅप्पीनेस क्लासमध्ये आठवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना सहभागी करुन घेतले जाते. यातील 45 मिनिट हॅप्पीनेस तास असतो. या पाठ्यक्रमाने विद्यार्थी खूश आहेत. सरकारी शाळेच्या शिक्षकांनुसार मुलांचा तणाव कमी होतो आणि या योजनेने ते आनंदी आहेत. या योजनेचे उद्घाटन धर्मगुरु दलाई लामा यांनी केले होते.