रोहित पवारांचा चंद्रकांत पाटलांवर निशाणा, म्हणाले – ‘राज्याला केंद्राप्रमाणे कंपन्या विकून पैसे मिळत नाहीत’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल अन् डिझेलच्या किंमती वाढत आहेत. राज्यात अनेक ठिकाणी पेट्रोलच्या दराने शंभरी गाठली आहे. या महिन्यात 16 वेळा पेट्रोलच्या दरात वाढ झाली आहे. त्यात सोमवारी (दि. 31) पुन्हा एकदा पेट्रोल 29 पैशांनी अन् डिझेल 26 पैशांनी महागले आहे. दरम्यान या दरवाढीला केंद्र सरकार जबाबदार असल्याचा आरोप विरोधी पक्षाकडून केला जात आहे, तर राज्य सरकारने पेट्रोलवरील कर कमी केले तर पेट्रोल स्वस्त होईल, असा दावा भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकात पाटील यांनी केला आहे.

तारुण्यातच टक्कल पडले असल्यास तुमच्यासाठी आहेत ‘हे’ रामबाण उपाय

 

अकाली वृद्धत्व टाळायचेय ? मग ‘हे’ उपाय आवश्य करा

यावरून राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार (Rohit Rajendra Pawar ) यांनी चंद्रकांत पाटलांना टोला लगावला आहे. राज्याला केंद्राप्रमाणे कंपन्या विकून, रिझर्व्ह बँकेकडून पैसे मिळत नाहीत. शेजारील राज्यांप्रमाणे वादळात हजारो कोटी रूपयाची मदतही मिळत नाही. हे वास्तव या नेत्यांनी समजून घेण्याची अन् राज्याच्या हितासाठी केंद्राकडे पाठपुरावा करण्याची गरज असल्याचे म्हणत पवार यांनी पाटील यांच्यावर निशाणा साधला आहे.

याबाबत आमदार पवार यांनी ट्विट केले आहे. राज्याने पेट्रोलवरील कर कमी करण्याची मागणी काल राज्यातील भाजपाच्या एका नेत्याने केली. पण 2014 तुलनेत कच्च्या तेलाच्या किंमती निम्म्याने कमी झाल्या तरी 2014 च्या तुलनेत केंद्राचा पेट्रोलवरील कर आज 350 टक्के वाढला आहे. आज पेट्रोलवर केंद्राचा 32.90 रुपये तर राज्याचा 28.35 रुपये कर आहे, असे असताना या नेत्यांचं गणित कळत नाही. राज्याला केंद्राप्रमाणे कंपन्या विकून, रिझर्व्ह बँकेकडून पैसे मिळत नाहीत. शेजारील राज्यांप्रमाणे वादळात हजारो कोटी रूपयाची मदतही मिळत नाही. हे वास्तव या नेत्यांनी समजून घ्यावे,असेही रोहित पवार यांनी म्हटले आहे.

Scars Removal : चेहर्‍यावरील जखमेच्या खुणांमुळं चिंतीत आहात ?, ‘हे’ घरगुती उपाय करा, जाणून घ्या

ठाकरे सरकारचा मोठा निर्णय ! मराठा विद्यार्थी आणि उमेदवारांना 10 टक्के EWS आरक्षणाचा लाभ मिळणार

Video : ‘महाविकास’ सरकारमधील नेत्यांवर भडकले फडणवीस, म्हणाले – ‘ओबीसी आरक्षणाचा मुडदा पडत असताना मंत्री मोर्चे काढत होते’

अजय-काजोलनं विकत घेतला नवीन बंगला, जाणून घ्या किंमत