बीड जिल्ह्यात राजकीय भूकंप ; राष्ट्रवादीचे आ. क्षीरसागर करणार भाजपला मदत

बीड : पोलीसनामा ऑनलाइन – बीडचे राष्ट्रवादीचे आमदार आणि विधान सभेतील विधिमंडळ गट उपनेते तसेच माजी मंत्री जयदत्‍त क्षीरसागर यांनी आज बीड येथील आर्शिवाद लॉन येथे बोलाविलेल्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात त्यांची भुमिका जाहिर केली असुन आ. क्षीरसागर आणि त्यांचे कार्यकर्ते हे भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार डॉ. प्रीतम मुंडे यांना मदत करणार आहेत.

आ. क्षीरसागर यांनी काल त्यांच्या फेसबुक पेजवर ‘लढा’ अशी पोस्ट केली होती. त्याच वेळी जिल्हयाच्या राजकारणात भूकंप येणार असल्याचे स्पष्ट झाले होते. तेव्हापासुन जिल्हयात राजकीय चर्चेला उधाण आले होते. आ. क्षीरसागर आणि त्यांचे बंधू भारतभुषण क्षीरसागर यांनी आज कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित केला होता. त्यामध्ये आ. क्षीरसागर यांनी राष्ट्रवादी पक्षातच राहून भाजपाच्या उमेदवार डॉ. प्रीतम मुंडे यांना मदत करणार असल्रूाचे सांगितले आहे. दरम्यान, गेल्या अनेक दिवसांपासुन आ. क्षीरसागर आणि त्यांचे कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षापासुन दुरावले गेले आहेत.

धनंजय मुंडे आणि आ. क्षीरसागर यांच्यामध्ये मतभिन्‍नता असल्याचे सर्वश्रृत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने आ. क्षीरसागर यांचे पुतणे संदीप क्षीरसागर यांना प्रचंड ताकत दिली आहे. त्यामुळे देखील आ. क्षीरसागर काही प्रमाणात पक्षावर नाराज आहे. आ. क्षीरसागर हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातच राहून भाजपच्या उमेदवाराला मदत करणार आहेत. आता आ. क्षीरसागर यांनी घेतलेल्या भुमिकेत राष्ट्रवादी बदल घडवुन आणेल की नाही याबाबत आगामी काळ ठरवेल मात्र आ. क्षीरसागर यांच्याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार काय भुमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.