भाजप, काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादीसह ‘या’ 14 राजकीय पक्षांना निवडणूक आयोगाची नोटीस

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन  – निवडणूक आयोगाने मान्यताप्राप्त 14 राजकीय पक्षांना नोटीस बजावल्या आहेत. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये केलेल्या खर्चाचा तपशील सादर न केल्यामुळे या नोटीस बजावण्यात आल्या आहेत. इतकेच नाही तर या 14 राजकीय पक्षांनी 10 मार्च 2019 पर्यंत खर्चाचा तपशील सादर करावा असेही कळविण्यात आले आहे असे निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी सांगितले आहे.

याबाबत सांगताना सहारिया म्हणाले की, “राज्य निवडणूक आयोगाच्या 15 ऑक्टोबर 2016 च्या आदेशान्वये राजकीय पक्षांना निवडणूक खर्च सादर करणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्यासंदर्भात वेगवेगळ्या माध्यमातून राजकीय पक्षांना वेळोवेळी अवगतही करण्यात आले होते. त्यामुळे आपली नोंदणी रद्द का करण्यात येऊ नये, अशी नोटीस आता बजावण्यात आली आहे.”

या राजकीय पक्षांना बजावण्यात आली आहे नोटीस

समोर आलेल्या माहितीनुसार ज्या राजकीय पक्षांना नोटीस बजावल्या आहेत त्यांची नावे पुढीलप्रमाणे आहेत. भारतीय कम्युनिस्ट पक्ष, भारतीय जनता पार्टी, नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी, भारताचा कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी), बहुजन समाज पार्टी, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, शिवसेना, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, जनता दल (सेक्युलर), समाजवादी पार्टी, ऑल इंडिया अण्णा द्रविड मुन्नेत्र कझगम, लोकजनशक्ती पार्टी, ऑल इंडिया मजलिस इत्तेहदूल मुस्लिमीन आणि जनता दल (युनायटेड)

ह्या हि बातम्या वाचा –

औरंगाबाद विमानतळाला संभाजीराजेंचे नाव द्या ; राज्यमंत्र्याने केली मागणी

पुलवामा हल्ला मोदी आणि खान यांनी ‘फिक्स’ केला

इंदापुर नगरपरिषदेची स्वच्छ सर्वेक्षणात देशपातळीवर गरूड झेप

नवे उद्योग धोरण मंजुरीसाठी दलाली, ७ कोटी खर्च दाखवून लाचखोरी : नवाब मलिक