State Excise Department Pune | राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून अवैध देशी दारूची निर्मिती व वाहतुक करणाऱ्यांवर कारवाई

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – State Excise Department Pune | लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election 2024) पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क ई विभागाने अवैधरित्या गावठी हातभट्टी दारु निर्मिती व वाहतुक करणाऱ्या वाहनावर कारवाई करण्यात आली. ही कारवाई गुरुवारी (दि.25) नेहरुनगर येथील झिरो बॉईज चौकात करण्यात आली. या कारवाईत एकाला अटक करुन 81 हजार 600 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क ई विभागाचे पथक गुरुवारी सकाळी गस्त घालत होते.
त्यावेळी नेहरुनगर येथून एका वाहनातून अवैधरित्या देशी दारुची वाहतूक करण्यात येणार असल्याची माहिती मिळाली.
त्यानुसार पथकाने झिरो बॉईज चौकात तीन चाकी रिक्षा आडवून तपासणी केली.
त्यावेळी रिक्षामध्ये 35 लि. क्षमतेच्या 6 कॅनमध्ये प्रत्येकी 210 लि. गावठी दारुची वाहतूक होत असल्याचे आढळून आले.
पथकाने उमेश शामराव कांलुके (वय-35 रा. काळेवाडी) याला ताब्यात घेऊन तीनचाकी वाहनासह 81 हजार 600 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

याशिवाय राज्य उत्पादन शुल्क ई विभागाने लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 41 गुन्हे दाखल केले असून 41 आरोपींना अटक केली आहे.
त्यामध्ये गावठी दारु 1016 लि., रसायन 600 लि., देशी मद्य 60 लि., विदेशी मद्य 21 लि., बिअर 111 लि., ताडी 213 लि. पाच वाहने असा एकूण 4 लाख 68 हजार 840 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.
आरोपींवर दारुबंदी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

ही कारवाई पुणे विभागाचे विभागीय उपायुक्त सागर धोमकर, व पुणे जिल्हा अधीक्षक सी.बी. राजपूत,
उपअधीक्षक सुजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य उत्पादन शुल्क ई विभाग, पिंपरी चिंचवड निरीक्षक एस.एम. परळे,
व दुय्यम निरीक्षक एन.आर. मुंजाळ, सहायक दुय्यम निरीक्षक एस.वाय दरेकर, तसेच जवान महेंद्र कदम, नारायण जाधव,
गजानन सोळंके यांनी केली आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Sunanda Pawar On Baramati Lok Sabha | बारामतीत शेवटच्या दोन दिवसात धनशक्तीचा वापर होईल, सुनंदा पवार यांचा मोठा दावा

Devendra Fadnavis On Sharad Pawar NCP | राष्ट्रवादीच्या जाहीरनाम्यावरून फडणवीसांची पवारांवर टीका, 542 पैकी 10 जागा लढवणाऱ्यांच्या आश्वासनांवर विश्वास कोण ठेवणार

Ajit Pawar Break Traffic Rules In Pune | पुण्यात उपमुख्यमंत्री अजित पवारांनी तोडले वाहतुकीचे नियम, ताफा उलट्या दिशेने सुसाट, वाहतूक पोलिसांची बघ्याची भूमिका (Video)

Ravindra Dhangekar On BJP | भाजपचाच देशभरातील महिलांच्या ‘मंगळसूत्रा’वर डोळा ! काँग्रेस व महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांचे भाजपवर टीकास्त्र