State Excise Department Pune | पुणे : राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून अवैध दारूसह सुमारे 1 कोटी 53 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 14 नियमित व 3 विशेष पथकांकडून कारवाई

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – State Excise Department Pune | सार्वत्रिक लोकसभा निवडणूक 2024 च्या अनुषंगाने पुणे जिल्ह्यात अवैध दारू निर्मिती, वाहतूक व विक्रीवर आळा घालण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क पुणे विभागाने आचारसंहिता लागू झाल्यापासून धडक मोहीम हाती घेतली आहे. मागिल एक महिन्यात 1 कोटी 58 लाख 08 हजार 805 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.

राज्य उत्पादन शुल्क पुणे विभागाच्या भरारी पथकाने 16 मार्च ते 22 एप्रिल या कालावधीत छापे टाकत 441 वारस गुन्ह्यांची नोंद व 325 आरोपींना अटक करण्यात आली आहे. या कारवाईत 15 हजार 846 लिटर गावठी हातभट्टी दारू, 755 लिटर देशी मद्य, 629 लिटर विदेशी मद्य, 804 लिटर बिअर व 3 हजार 954 लिटर ताडीसह 53 वाहने असा मुद्देमाल जप्त केला आहे.

महाराष्ट्र दारूबंदी कायदा 1949 चे कलम 93 अंतर्गत प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून दोन किंवा त्यापेक्षा अधिक गुन्ह्यांची नोंद असलेल्या व सराईत आरोपी विरूद्ध चांगल्या वर्तणूकीचे बंधपत्रासाठी दाखल 45 प्रस्तावांपैकी 4 जणांचे बंधपत्र घेण्यात आले आहे. 1 लाख 5 हजार रुपये बंधपत्राची रक्कम घेण्यात आली आहे. बंधपत्र घेतल्यानंतर 41 प्रकरणांत नियमाचे उल्लंघन निदर्शनास आले. परवानाकक्ष नमुना एफएल-3 अनुज्ञप्ती विरुद्ध एकूण 77 नियमभंग प्रकरणे, त्यापैकी 3 निलंबित करुन दंड ठोठावण्यात आला आहे.

कारवाईसाठी 14 नियमित व 3 विशेष पथके तयार

आगामी लोकसभा निवडणूक 2024 च्या अनुषंगाने जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात अवैध मद्य निर्मिती, वाहतूक व विक्री तसेच परराज्यातील मद्य, अवैध ताडी आदींची विक्री, अवैध ढाब्यांवर मद्याची विक्री होण्याची शक्यता नाकारता येत नसल्यामुळे राज्य उत्पादन शुल्क पुणे विभागाने एकुण 14 नियमित व 3 विशेष पथके तयार केली आहेत. ठिकठिकाणी तपासणी नाके उभारण्यात येऊन संशयित वाहनांची तपासणी करण्यात येत आहे. तसेच रात्रीची गस्त घालण्यात येत आहे. राज्याचा महसूल चुकवून परराज्यातून येणाऱ्या मद्य साठ्यावर तसेच किरकोळ अनुज्ञप्तीचे व्यवहार विहीत वेळत चालू नसल्यास व काहीही आक्षेपार्ह आढळून आल्यास कठोर कारवाई करण्यात येणार आहे.

ही कामगिरी राज्य उत्पादन शुल्क महाराष्ट्र राज्य विजय सुर्यवंशी, संचालक अमलबजावणी व दक्षता प्रसाद सुर्वे, विभागीय उपायुक्त पुणे विभाग सागर धोमकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. नागरिकांना अवैध मद्य निर्मिती, वाहतूक व विक्री याबाबत माहिती मिळाल्यास टोल फ्री क्र. 1800233999 व दूरध्वनी क्र. 020-26058633 या क्रमांकावर संपर्क साधून माहिती द्यावी, असे आवाहन राज्य उत्पादन शुल्क पुणे विभागाचे अधीक्षक सी.बी. राजपुत यांनी केले आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Keshav Upadhye-Pune BJP | संपत्ती लुबाडण्याचा काँग्रेसचा कट, जनताच यशस्वी होऊ देणार नाही ! भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांचा रोखठोक इशारा

Amol Kolhe On Shivajirao Adhalrao Patil | अमोल कोल्हेंनी उडवली आढळरावांची खिल्ली, म्हणाले ”ते रडीचा डाव खेळत आहेत, थ्री इडियट चित्रपटातील…”

Cheating Fraud Case Pune | पुणे महापालिकेत नोकरी लावण्याच्या बहाण्याने साडे आठ लाखांची फसवणूक