राज्य उत्पादन शुल्क विभागाचे सांगलीत छापे

सांगली : पोलीसनामा ऑनलाईन – राज्य उत्पादन शुल्क विभागाने जिल्ह्यात अवैधरित्या मद्य विक्री करणाऱ्या हॉटेल, धाब्यावर छापे टाकले. ४१ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सांगलीतील दोन आणि कुपवाड औद्योगिक वसाहतीतील एका हॉटेलवर कारवाई करण्यात आली. विदेशी आणि देशी असा ६६ लिटर मद्यसाठा जप्त करण्यात आला. पाच जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

आषाढी एकादशीनिमित्त ड्राय डे असल्याने जिल्ह्यात बेकायदेशीररित्या मद्याची विक्री होऊ नये, यासाठी हॉटेल, खानावळी, ढाबे व संशयित वाहने यांची तपासणी करण्यात आदेश अधीक्षक कीर्ती शेडगे यांनी दिले होते. त्यानुसार छापे टाकण्यात आले.

शहरातील दोन आणि कुपवाड औद्योगिक वसाहतीतील एका हॉटेलवर मद्य विक्री होत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार भरारी पथकाने छापेे टाकले. अधीक्षक कीर्ती शेडगे, उपअधीक्षक विश्‍वजित देशमुख यांच्या नेतृत्वाखाली निरीक्षक संभाजी कोळी, श्रीकांत हुणूंगरे, राजेंद्र झोळ यांचा कारवाईत सहभाग होता.

आरोग्यविषयक वृत्त –

सतत सर्दी होणं म्हणजे ‘या’ आजाराचा धोका, वेळीच ओळखा अन् अशी काळजी घ्या

केसांना कलरिंग करताना ‘या’ ४ गोष्टींची जरूर काळजी घ्या

सफरचंद आरोग्यासाठी फायदेशीर, ‘हे’ 7 महत्वाचे फायदे होतात, जाणून घ्या

जांभळातील पोषक तत्वे शरीराच्या ‘या’ 3 भागांना ठेवातात निरोगी, जाणून घ्या सर्वकाही

पाय थंड पडणे, सूज येणे ही गंभीर समस्या, वेळीच ‘हे’ उपचार करा

अंगाला खाज येत असेल तर करा ‘हे’ ५ घरगुती उपाय

सूर्यफुलाच्या बियांपासून ‘हे’ फायदे तर भोपळ्याच्या बिया ‘या’ ४ गोष्टींसाठी उपयुक्‍त, जाणून घ्या

स्त्रीयांप्रमाणेच पुरुषांनाही येतो ‘मेनोपॉज’, तुम्हाला माहित आहे का ?

स्त्रीयांमधील ‘ही’ लक्षणे देतात त्या ‘प्रेग्नेंट’ असल्याचे संकेत

चिकन खाल्यामुळं ‘हे’ आजार ‘कंट्रोल’मध्ये राहतात, जाणून घ्या