पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – State Excise Department | महाराष्ट्र दारुबंदी कायद्यांतर्गत (Maharashtra Prohibition Act) अवैध मद्य विक्री करणाऱ्यांविरुद्ध तसेच अवैध ठिकाणी मद्य सेवन करणाऱ्या ग्राहकांविरुद्ध पुणे जिल्ह्यात 7 ते 9 जानेवारी दरम्यान विशेष मोहिम राबवून एकूण 29 गुन्हे नोंदविण्यात आले आहेत, अशी माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पुणे (State Excise Department) कार्यालयाने दिली आहे.
या कारवाईत अटक (Arrest) करण्यात आलेल्या आरोपींना न्यायालयामध्ये हजर केल्यानंतर 25 आरोपींना दोषी ठरविण्यात आले असून न्यायालयाकडून या आरोपींना एकूण 37 हजार रुपये दंड करण्यात आला आहे. यापूर्वी सप्टेंबर 2022 ते 31 डिसेंबर 2022 या कालावधीमध्ये अशा प्रकारचे एकूण 35 गुन्हे नोंदविण्यात आले होते. त्यामधील एकूण 71 आरोपींना न्यायालयाने दोषी ठरवून 1 लाख 27 हजार 80 रुपये इतका दंड करण्यात आला आहे.
याशिवाय अवैध मद्य निर्मिती वाहतूक व विक्रीचे समुळ उच्चाटन करण्यासोबतच गुन्हेगारांना वचक बसविण्याकरिता राज्य उत्पादन शुल्क पुणे विभागाने (State Excise Department) चालू वर्षामध्ये 382 सराईत आरोपींकडून चांगल्या वर्तणुकीचे बंधपत्र घेण्यासाठी सक्षम प्राधिकाऱ्यांना प्रस्ताव सादर केलेले आहे. तसेच एमपीडीए (MPDA) अंतर्गत कारवाईसाठी एकूण 17 प्रस्ताव व मोक्कांतर्गत (MCOCA)2 प्रस्ताव संबंधित सक्षम प्राधिकाऱ्यांकडे देण्यात आले आहेत. अधिक दराने मद्य विक्री करणारे दारु विक्री दुकान व देशी दारु बार अनुज्ञाप्तीधारकाविरुद्ध एकुण 10 विभागीय गुन्हे (FIR) दाखल करण्यात आले आहेत.
अधिक्षक राज्य उत्पादन शुल्क कार्यालयाच्यावतीने 2021-22 पेक्षा वर्ष 2022-23 मध्ये एकूण नोंदविलेल्या
गुन्ह्यांमध्ये 434 ने वाढ झालेली आहे. तर अटक आरोपी संख्येमध्ये 596 ने वाढ झालेली आहे.
जप्त वाहनांच्या संख्येत 72 ने वाढ झाली असून जप्त मुद्देमालाच्या किंमतीमध्ये
5 कोटी 86 लाख 40 हजार 662 रुपये इतकी वाढ झालेली आहे.
जिल्ह्यात अवैध मद्य निर्मिती, वाहतूक व विक्री करणाऱ्या विरुद्ध कारवाई करण्यात येत आहे.
कोणत्याही नागरिकास अवैध मद्य निर्मिती, वाहतुक व विक्रीबाबत माहिती मिळाल्यास टोल फ्री क्र.१८००२३३९९९९
व दुरध्वनी क्र. ०२०-२६०५८६३३ या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन
राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक चरणसिंह राजपुत यांनी केले आहे.
Web Title :- State Excise Department | state excise department action against 29 people for illegal sale of liquor and drinking in pune
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
Tejas Thackeray | पोस्टरबाजीमुळे पुन्हा एकदा तेजस ठाकरे राजकीय मैदानात उतरण्याच्या चर्चांना उधान