देशद्रोहाचा आरोपी शरजील इमामचं राजकीय ‘कनेक्शन’, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जवाहरलाल नेहरु विश्वविद्यालयाचा म्हणजेच जेएनयूचा विद्यार्थी शरजील इमाम याचा देशद्रोही वक्तव्यामुळे जोरदार वादंग उठला आहे. त्याने आपल्या भाषणात वक्तव्य केले की आसामसह पूर्ण उत्तर – पूर्व भारताला उर्वरित भारतापासून हटवण्यात यावे. आता हा व्हिडिओ व्हायरल होत आहे. शरजीलच्या विरोधात देशद्रोह तसेच धर्माच्या आधारे वैमानस्य पसरवण्याचा गंभीर आरोप लावत अनेक राज्यात गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. त्याला मंगळवारी बिहारच्या जहानाबादमधून अटक करण्यात आली. यापूर्वी पोलिसांनी त्याच्या भावाला आणि एका मित्राला ताब्यात घेतले आहे, ज्यांची चौकशी सुरु आहे.

शरजीर बिहारच्या जहानाबादचा मूळ निवासी आहे. त्याचे वडील अकबर इमाम सत्ताधारी जनता दल यूनायडेटचे नेता होते. अकबर इमामा जेडीयूच्या तिकिटावर जहानाबादच्या विधानसभा निवडणूकीत लढले होते. शरजीलचे काका या प्रकरणाकडे राजकीय चश्म्याने पाहत आहेत. त्यांच्या मते दिल्ली विधानसभा निवडणूकीत फायदा व्हावा यासाठी त्यांच्या पुतण्याला अडकवले जात आहे. शरजीलच्या आईने आपल्या मुलाला निर्दोष मानले आहे. शरजीलच्या अटकेवर मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी सांगितले की देशाच्या विरोधात कोणतेही प्रकार सहन केला जाणार नाही, या प्रकरणी कायदा आपले काम करेल.

भाऊ आणि मित्रांना ताब्यात घेऊन चौकशी –

या दरम्यान शरजीलला अटक करण्यासाठी पोलिसांनी बिहार स्थित त्यांच्या मूळ घरी सोमवारी रात्री छापेमारी केली. छापेमारीमध्ये शरजील मिळाला नाही तरी पोलिसांनी त्यांच्या भावाला म्हणजे मुजम्मिल आणि त्याच्या एका मित्राला ताब्यात घेण्यात आले. असे सांगण्यात येत आहे की त्यांच्याकडून शरजीलसंबंधित महत्वाची पुरावे मिळतील.

जेएनयू प्रशासनाने मागितले स्पष्टीकरण –

या प्रकरणी जेएनयू प्रशासनाने कठोर भूमिका घेतली आहे. जेएनयूच्या प्रॉक्टरने शरजीनला समन्स जारी करत देश द्रोहाच्या आरोपाअंतर्गत 3 फेब्रुवारीपर्यंत स्पष्टीकरण मागितले आहे.

समोर आले राजकीय कनेक्शन –

देशद्रोहासह इतर आरोपात असलेल्या शरजील इमामचे राजकीय कनेक्शन समोर आले आहे. तो जेडीयू नेता अकबर इमाम यांच्या मुलगा आहे. अकबर इमाम जेडीयूच्या तिकिटावर जहानाबादमधून विधानसभा निवडणूक लढले होते. त्या निवडणूकीत राष्ट्रीय जनता दलाचे सच्चिदानंद यादव यांच्याकडून ते पराभूत झाले होते. शरजीलचा एक लहान भाऊ आहे ज्याचे जहानाबादचे माजी खासदार अरुण कुमार यांच्याशी निकटचे संबंध आहेत. तो त्यांच्याच सोबत असतो.

प्रकरणाला राजकीय रंग देत आहेत काका –

शरजीलचे काका अरशद इमाम पूर्ण प्रकरणाला राजकीय रंग देत आहेत. ते म्हणाले की दिल्ली विधानसभा निवडणूकीचा लाभ मिळवण्यासाठी त्यांच्या पुतण्याच्या विरोधात कट रचण्यात आला आहे. 40 मिनिटाच्या व्हिडिओतील काही मिनिटांच्या वक्तव्यातील काही अधर्वट बाब समोर ठेवली आहे. शरजीलची आई आपल्या मुलाला निर्दोष मानत आहे. त्या म्हणाल्या की त्यांच्या कुटूंबाचा देशाच्या संविधानावर विश्वास आहे.

फेसबुक पेज लाईक करा