UP : योगी सरकारनं इतर राज्यात अडकलेल्या लोकांसाठी जारी केले हेल्पलाईन नंबर

लखनऊ :  वृत्तसंस्था –   कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे देश आणि राज्यात दीर्घकाळापासून सुरु असलेल्या लॉकडाऊमुळे अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. या समस्यांवर तोडगा काढण्यासाठी योगी सरकार प्राधान्याने उपाययोजना करत आहे. राजस्थानमध्ये अडकून पडलेल्या विद्यार्थ्यांना त्यांच्या घरी पोहचवण्यासाठी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी पुढाकार घेऊन त्यांना घरी पोहचवले. यानंतर देशाच्या इतर राज्यात अडकलेल्या कामगार आणि गरीब लोकांना घरी पोहचवण्यासाठी योगी आदित्यनाथ सरकारने पावलं उचलली आहेत.

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आज लोकभवनात टीम -11 सह बैठक घेतली. याबैठकीत कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्याच्या उपाययोजनांसह लोकांवर करण्यात येणारे उपचार आणि निदानाच्या प्रगतीचा आढावा घेतला. यानंतर त्यांनी उत्तर प्रदेशातील कामगार व देशातील वेगवेगळ्या राज्यात अडकून पडलेल्या कामगारांना सुरक्षित घरी पोहचवण्याच्या मोहिमेबाबत माहिती घेतली.
इतर राज्यात अडकलेल्यांची माहित घेण्यास सुरुवात

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी इतर राज्यात राहणाऱ्या उत्तर प्रदेशातील कामगार, मजूरांनी आपल्या घरी येण्यासाठी पायी प्रवास करू नये असे आवाहन केले आहे. त्यांनी सांगितले की. आपल्या राज्यातील कामगार आणि मजूरांना राज्यात आणण्यासाठी संबंधित सरकारांसोबत संपर्कात आहोत. राज्यातील स्थलांतरित कामगार, मजूर यांना राज्यांमधून अणण्यासाठी प्रभावी व्यवस्था सुनिश्चित केली जात आहे. स्थलांतरीत कामगारांची नावे, पत्ते दूरध्वनी क्रमांक आणि आरोग्य स्थिती यासह संपूर्ण तपशील घेतला जात आहे. जेणे करून त्यांना सुखरुप राज्यात आणण्यासाठी कृती योजना आखता येईल.

विद्यार्थ्यांना सुखरुप घरी पोहचवलं

त्यांनी सांगितले की, आतापर्यंत दिल्लीतील सुमारे 4 लाख कामगार व मजूर, हरियाणामधील 12 हजार मजूर, कोटा राजस्थानमधील 11 हजाराहून अधिक विद्यार्थी सुखरुप राज्यात परते आहेत. त्याचप्रमाणे प्रयागराज येथे शिकणाऱ्या 15 हजाराहून अधिक स्पर्धा परिक्षेच्या विद्यार्थ्यांना राज्यातील विविध जिल्ह्यात सुरक्षितपणे त्यांच्या घरी पाठविण्यात आले आहे. राज्यातील स्थलांतरित कामगार, मजूर यांना इतर राज्यातून परत आणण्यासाठी प्रभावी व्यवस्था करावी, अशा सूचना त्यांनी दिल्या आहेत. त्यांनी सांगितले की, राज्यात परत येण्यापूर्वी परप्रांतीय कामगारांचीही सक्तीची चाचणी घ्यावी.

राज्याच्या सीमा बंद करण्याचे निर्देश

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी राज्याची सीमा पूर्णपणे सील करण्याचे निर्देश दिले आहेत. सीमा भागात दक्षता घेण्याचे निर्देश त्यांनी दिले आहेत. तसेच नेपाळसह इतर राज्यांच्या परवानगीशिवाय कोणीही राज्यात येणार नाही याची खबरदारी घेण्यात यावी, असेही त्यांनी सांगितले.

कामगारांच्या रेशनची व्यवस्था करा

मुख्यमंत्री योगी आदित्यानाथ यांनी सांगितले की, गृहसंकुल लोकांच्या देखरेखीसाठी समित्यांची स्थापना करावी. या समितीमध्ये मंगल दल, नेहरू युवा केंद्र, एनएसए, एनसीसी इत्यांदींची मदत घ्यावी. याबरोबर कम्युनिटी किचन सुरु करून त्यामध्ये महिला स्वयंसेवक बचत गटांच्या महिलांकडून स्वयंपाक तयार करून घ्यावा. आरोग्य तपासणीनंतर कामगारांना घरी पाठवावे. घरातील सर्व कामगारांना रेशन उपलब्ध करून द्यावे. 10 लाख मजुरांना तात्काळ दाखल करून घेण्यासाठी क्वारंटाईन सेंटर, निवारा गृह स्थापित करावीत. यासाठी महाविद्यालयांचा वापर करावा. यामध्ये कम्युनिटी किचन, शौचालये यासह सर्व अत्यावश्यक सेवा उपलब्ध असणे आश्यक आहे.

दुसऱ्या राज्यातून युपी येण्यासाठी संपर्कासाठी नंबर

1.   महाराष्ट्रातून युपीत येण्यासाठी या क्रमांकावर संपर्क साधावा- 700 7304 242 आणि 9454 400 177

2.   तेलंगणा आणि आंध्र प्रदेशातून उत्तर प्रदेशात येण्यासाठी या क्रमांकावर संपर्क साधावा 98 866 400 721 किंवा 9454405844 किंवा 9454400195

3.   गोवा, कर्नाटक येथून यूपीत येण्यासाठी या क्रमांकावर संपर्क साधावा – 9415 90 4444 किंवा 9454 400 135

4.   पंजाब आणि चंदीगड येथून यूपीला येण्यासाठी – 9455 3511 11 किंवा 9454 400 190

5.   पश्चिम बंगाल आणि अंदमान आणि निकोबार – 9639 981 600 किंवा 9454 400 537

6.   राजस्थानमधून युपीत येण्यासाठी – 945 44 10235 किंवा 94544 05388

7.   हरियाणा येथून युपीत येण्यासाठी – 94544 18828 किंवा 9454418828।

8 .   बिहार, झारखंड येथून यूपीत येण्यासाठी – 9621650067 किंवा 9454400122

9.   गुजरात, दमन, दीव, दादरा आणि नगर हवेली येथू युपीत येण्यासाठी – 8881954573 किंवा 9454400191

10.  उत्तराखंड, हिमाचल प्रदेश येथून युपीत येण्यासाठी – 8005194092 किंवा 9454400155

11.   मध्य प्रदेश, छत्तीसगड येथून युपीत येण्यासाठी – 9454410331 किंवा 9454400157

12.   दिल्ली, जम्मू-काश्मीर. लडाख येथून यूपीत येण्यासाठी – 8920827174 किंवा 7839854579 किंवा 9454400114 किंवा 7839855711 किंवा 7839854569

13.   ओडीशा येथून उत्तर प्रदेशात येण्यासाठी – 9454400133

14.   तामिळनाडू, पांडिचेरी येथून युपी येणयासाठी – 9415114075 किंवा 9454400162

15.  अरुणाचल प्रदेश, आसाम, नागालँड, मेघालय, मणिपूर, त्रिपुरा, मिझोरम येथून उत्तर प्रदेशात येण्यासाठी – 9454441070 किंवा 9454400148

16.  केरळ, लक्षद्वीप येथून युपीत येण्यासाठी – 6386725278 किंवा 9936619394 किंवा 9412194347 किंवा 9454400162 या नंबरवर संपर्क साधावा.