रिक्षाचालकावर २०० कोटींच्या करचुकवेगिरीचा ‘आरोप’, अधिकाऱ्यांनी मारला छापा ; पुढं झालं ‘असं’ काही

भरुच (गुजरात) : वृत्तसंस्था – गुजरातच्या भरुच जिल्ह्यातील एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. भरुचच्या जीएसटी विभागाच्या पथकाने टॅक्स चोरीच्या संशयामुळे एका रिक्षा चालकाच्या घरी छापा मारला. जीएसटी अधिकाऱ्यांनी २०० कोटी रुपयांच्या टॅक्स चोरीच्या आरोपाखाली सुरेश गोहिल नावाच्या रिक्षा चालकाच्या घरावर छापा मारला.

स्टेट सर्विस अँड गुड्स टॅक्स (SGST) च्या या अचानक झालेल्या कारवाईमुळे सुरेश आणि त्याचे कुटुंबीय चक्रावून गेले. सुरेश भरुच मध्ये रिक्षा चालवून कसाबसा आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवतात. त्यांची रोजची कमाई जवळपास केवळ २०० रुपयांच्या आसपास होते. अशात जीएसटी विभागाच्या या कारवाईमुळे ते हैराण झाले आहेत. खूप वेळ शोधाशोध करूनदेखील अधिकाऱ्यांना सुरेशच्या घरात काहीही मिळालेले नाही.

छत टपकणाऱ्या घरात राहते हे कुटुंब :

टेम्पो-रिक्षा चालवून घराचा उदरनिर्वाह करणारे सुरेशचे कुटुंबीय एका मोडकळीस आलेल्या घरात राहते. पावसाळ्याच्या दिवसांमध्ये त्यांच्या छत मोठ्या प्रमाणावर गळत असून हे कुटुंबीय तशाच परिस्थितीत तडजोड करत राहते. त्यांची परिस्थिती अत्यंत हलाखीची असल्याचे दिसून आले.

जीएसटी विभागाच्या अधिकाऱ्यांच्या सांगण्यानुसार सुरेश एका गोहिल कन्सल्टंट कंपनी चे मालक असल्याची माहिती त्यांना मिळाली होती. त्यांची कंपनी ऑनलाईन रजिस्टर्ड असून या कंपनी ने २०० कोटी रुपयांची करचुकवेगिरी केली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार सुरेशचे शिक्षण केवळ तिसरीपर्यंत झाले असून त्याला जीएसटीचा अर्थदेखील माहित नाही.

याआधी अलिगढमध्ये घडले होते असे प्रकरण :

काही काळापूर्वी उत्तर प्रदेश च्या अलिगढ जिल्ह्यात याच प्रकारचे प्रकरण समोर आले होते. येथे कारविभागाच्या एका पथकाने एका चौकशीत एका छोट्या कचोरीच्या विक्रेत्याची वार्षिक उलाढाल ६० लाख असल्याच्या प्रकरणाचा खुलासा केला होता. अधिकाऱ्यांच्या संशयानुसार या विक्रेत्याची उलाढाल १ कोटी पेक्षा जास्त होती. त्यानंतर त्यांनी या दुकानदाराला नोटीस पाठवली होती.

ताण-तणाव दूर करून आनंदी जीवन जगा, ५ सोप्या पद्धती

तुम्ही खात असलेले अन्न हे शरीर व मनासाठी आरोग्यवर्धक आहे का ?

विविध रंगाच्या बाटल्यांमधील पाणी सेवन करा, आरोग्य सुधारेल

‘तारूण्य’ टिकवण्यासाठी हसत रहा, जाणून घ्या महत्वाचे फायदे

बुद्धविहार तसेच उर्वरित रहिवाशांचे त्याच ठिकाणी पुनर्वसन करणार

आदिवासींसाठी स्वतंत्र आरोग्य संस्था असायला हवी