पुण्यातील ‘होम क्वारंटाईन’बाबत राज्य सरकारचे स्पष्टीकरण

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –  राज्य सरकारने कोरोना बाधितांच्या संदर्भातील नियमांमध्ये बदल केले. यापुढे कोरोना बाधित रुग्णाला होम आयसोलेशन बंद करण्याचा निर्णय काल घेण्यात आला. त्यामुळे कोरोना बाधित रुग्णाला कोविड केअर सेंटरमध्ये भरती करावे लागणार आहे. होम आयसोलेशन 100 टक्के बंद करुन कोविड सेंटर वाढवा आणि तिथे रुग्णांना आयसोलेट करा, अशा सूचना राज्य सरकारने काल दिल्या. सरकारच्या निर्णयाला पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी विरोध केला. यानंतर पुणे शहरात सुरु असलेले गृहविलगीकरणाची सुविधा कायम राहणार असल्याचे राज्य सरकारने स्पष्ट केलं आहे.

मागील दोन आठवड्यापासून पुणे शहरातील कोरोना बाधितांची संख्या वेगाने कमी होत आहे. दैनंदिन रुग्ण संख्या देखील हजाराच्या आत आली आहे. तसेच रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढले आहे. राज्य सरकारने राज्यातील ज्या जिल्ह्यांमध्ये कोरोना बाधितांचा साप्ताहिक सरासरीदर जास्त आहे, अशा जिल्ह्यांमध्ये संस्थात्मक विलगीकरणावर भर देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. राज्य सरकारच्या या निर्णयाला पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ आणि शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी जोरदार विरोध केला.

शहरात पहिल्या लाटेत पुण्यातील पेठांमधील आणि झोपडपट्टीतील नागरिकांची संख्या जास्त होती. त्यामुळे संस्थात्मक विलगीकरण केंद्र सुरु करण्यात आले होते. मात्र, दुसऱ्या लाटेत बाधित होणाऱ्यांमध्ये सोसायटी, बंगल्यांमध्ये राहणाऱ्या लोकांनी होम आयसोलेशनवर जास्त भर दिला होता. असे असताना राज्यापेक्षा कोरोना बाधितांची सरासरी जास्त आहे अशा 18 जिल्ह्यांमध्ये होम आयसोलेशन पूर्णपणे बंद करुन, त्याऐवजी संस्थात्मक विलगीकरण सुरु करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी काल (मंगळवार) जाहीर केला. यावरुन पुण्यात गोंधळ उडाला आणि राजकारणही तापले. महापौर मुरलीधर मोहोळ आणि शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी राज्य सरकारच्या या निर्णयाला विरोध केला होता.

राज्य सरकारचं स्पष्टीकरण

–  ज्या जिल्ह्यांचा बाधितांचा साप्ताहिक सरासरी दर राज्यापेक्षा अधिक आहे, अशा जिल्ह्यांमध्ये विशेषत: ग्रामीण भागात संस्थात्मक विलगीकरणावर भर देण्यात यावा.

–  होम आयसोलेशनची सुविधा सुरुच ठेण्यात येणार असल्याचे राजेश टोपे यांनी स्पष्ट केले.

–  याबाबतचा गोंधळ आता दूर झाला असून, पुणे शहरात होम आयसोलेशनची सुविधा सुरुच राहणार