केंद्र सरकारविरोधात राष्ट्रवादी आक्रमक; जिल्हा व नागरी बँकांच्या अस्तित्वासाठी टास्क फोर्स

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – केंद्र सरकारने बँकिंग कायद्यात सुधारणा करण्याच्या नावाखाली राज्यातील जिल्हा व नागरी सहकारी बँकांचे अस्तित्व नष्ट करण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. त्याविरोधात राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. राज्यात स्वतंत्र कायदा करता येतो का? केंद्र सरकार जे बदल करू इच्छित आहे, त्याला न्यायालयात आव्हान दिले तर कोणते मुद्दे मांडले गेले पाहिजेत, यावर विस्तृत चर्चा करण्यासाठी एक टास्क फोर्स स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. या फोर्सच्या अध्यक्षपदी सहकारमंत्री बाळासाहेब पाटील असणार आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसची नुकतीच बैठकी झाली. त्यामध्ये काँग्रेस शिवसेना आणि राष्ट्रवादी या तिन्ही पक्षांच्या प्रमुख नेत्यांना एकत्रित घेऊन टास्क फोर्स स्थापन करायचा आणि राज्य सरकार कसा कायदा करू शकतो, यावर मंथन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यातील सहकार चळवळीवर काँग्रेस-राष्ट्रवादीची मजबूत पकड आहे. भाजपला यावर यश मिळवता येत नसल्याने सहकार चळवळ मोडीत काढण्याचे डाव आखला जात आहे.

पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि मंत्री नवाब मलिक म्हणाले, आजारपणातून बरे झाल्यानंतर शरद पवार Sharad Pawar यांनी पहिलीच राष्ट्रवादीच्या मंत्र्यांची बैठक घेतली. बैठकीत त्यांनी, भाजपचा पश्चिम बंगालमध्ये पराभव झाल्यानंतर तेथे लोकशाहीच्या माध्यमातून अस्तित्वात आलेल्या सरकारला त्रास देण्यास सुरुवात झाली आहे. मुख्य सचिव, गृहसचिवांना देण्यात येणारा त्रास याबाबात माहिती देण्यात आली. त्याचबरोबर बैठकीत पवार Sharad Pawar यांनी ओबीसी समाजाला शैक्षणिक, राजकीय आणि नोकरीतील आरक्षण मिळाले पाहिजे, तसेच मराठा समाजालाही आरक्षण मिळाले पाहिजे अशी भूमिका मांडली. लसीकरणाचा वेग महाराष्ट्रात थंडावला आहे. त्यासाठी आपण आदर पूनावाला यांचे वडील सायरस पूनावाला यांच्याशी थेट संवाद साधून लसीकरणाचा तिढा सोडू असेही पवार यांनीम्हंटल्याचे मलिक म्हणाले.

त्या निर्णयाचा जन्म पुणे-सातारा प्रवासात
सोमवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी खासगी रुग्णालयातील उपचाराचे दर निश्चित करण्याचा आदेश काढला. त्यावर बोलताना अजित पवार म्हणाले की आपण सार्वजनिक आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्यासोबत पुणे- सातारा प्रवास करत असताना या निर्णयाचा जन्म झाला.

Also Read This : 

टाचांच्या भेगांनी त्रस्त आहात तर मग ‘या’ टिप्स फोलो करा; जाणून घ्या

‘तुझ्यात जीव रंगला’ फेम माधुरी पवारच्या डान्सने चाहते घायाळ !

Paytm : तुम्हाला देखील कॅशबॅक ऑफरचा मेसेज आलाय तर व्हा सावध अन्यथा…

माझ्यामुळं सत्ता गेल्याचं फडणवीसांना दु:ख; संजय राऊतांचा माजी मुख्यमंत्र्यांना टोला

रक्षा खडसेंचा मोठा खुलासा ! म्हणाल्या – ‘एकनाथ खडसे-देवेंद्र फडणवीस यांच्यात बोलणं झालं’

मुंबई HC ची ठाकरे सरकारला सूचना, म्हणाले – ‘अदर पुनावालांना देशात सुरक्षित वाटत नसेल तर तुम्ही त्यांना आश्वस्थ करा’