अबब ! राज्याला मद्यविक्रीतून मिळाला 776.47 कोटींचा महसूल

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन  –  राज्यात मद्याची दुकाने उघडल्यानंतर राज्याला मद्यविक्रीतून तब्बल 776.47 कोटींचा महसुल मिळाला आहे, अशी माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाचे प्रमुख कांतीलाल उमाप यांनी दिली. दरम्यान कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मद्यविक्री बंद करण्यात आली होती. त्यानंतर 4 मेपासून राज्यातील काही शहरात मद्यविक्री करण्यास परवानगी देण्यात आली आहे. त्यानुसार एका महिन्यात हा महसूल मिळाला आहे.

राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी लॉकडाऊन करण्यात आले होते. याकाळात सर्वच आस्थापना बंद करण्यात आल्या होत्या. त्यात यावेळी प्रत्येक शहरात मद्यविक्री देखील बंद केली होती. यानंतर मद्यशौकीनांची चांगलीच पंचाईत झाली होती. अनेकांनी मद्यविक्री सुरू करावी अशी मागणी देखील केली होती. मात्र या काळात अनेकांनी अवैधरित्या मद्यविक्री करून अमाप पैसा कमावला. राज्य उत्पादन शुल्क विभागाने मोठ्या प्रमाणात कारवाई केली आहे. जवळपास 4 हजाराहून अधिक गुन्हे राज्यात दाखल करण्यात आले आहेत.

राज्यात 4 मे पासून मद्यविक्री सुरू करण्यात आली. त्यात ठराविक शहरात ही विक्री सुरू केली होती. जवळपास 9 जिल्हे आणि मुंबई येथे मद्यविक्री बंद होती. दरम्यान मद्यविक्री सुरू होताच पहाटेपासूनच मद्य घेण्यासाठी अनेकांनी लांबच्या लांब रांगा लागल्या होत्या. आता दररोज काही वेळासाठी दुकाने उघडी असल्याने या रांगा कमी झाल्याचे दिसते.

राज्यात मद्यविक्री सुरू झाल्यानंतर शासनास तबल 776.47 कोटींचा महसूल मिळाला आहे. यात जमा अंदाजे 468.47 कोटी असून, विक्रीकर साधारण 308.0 कोटी असा आहे. तसेच राज्यात सोलापूर शहर वगळता सर्व जिल्ह्यात किरकोळ दारूची दुकाने सुरू झाली आहेत. सोलापूरमध्ये केवळ घाऊक परवाने चालविण्यास परवानगी दिली आहे. आतापर्यंत मुंबई व एमएसडी उर्वरित 30 जिल्ह्यांना फक्त एफएलच्या माध्यमातून ऑफसेटची परवानगी दिली आहे, असे उमाप यांनी पोलिसनामाशी बोलताना सांगितले.

—चौकट—

राज्यभरात सुरू असणारे दुकाने

एफएल 2- 1365

सीएल 3- 2820

एफएल/बीआर 2- 3359

एफएल 3- 5974